Alia Bhatt Daughter Esakal
मनोरंजन

Alia Bhatt Daughter: 'लेकीला हिरोईन नाही तर बनवायचयं... 'आलियाचा खुलासा

Vaishali Patil

Alia Bhatt Daughter: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत. दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. करण जोहर दिग्दर्शित ही सिनेमासात दिवसांनी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात आलिया अन् रणवीर सिंगसोबत रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही चित्रपट आलियासाठी खुप खास आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आलियाने या चित्रपटाची शुटिंग ती आई झाल्यानंतर लगेचच काही महिन्यांनी सुरु केली होती. करणनेही याबद्दल तिची माफी मागितली होती की तिला तिच्या मुलीकडून लांब रहावं लागलं होतं.

आता या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने मुलगी राहा हिच्याबद्दल खुलासा केला आहे. आता आलियाची लेक राहा ही सात महिन्यांची आहे. आत्तापासुनत आलियानं तिच्या लेकीच्या करिअरचा खुलासा केला.

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलिया एका कार्यक्रमात बोलतांना दिसली. यावेळी आलियाने स्काय ब्लू साडी घातली होती.

ती मिडियासोबत गप्पा मारतांना बोलली की, आता जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीला राहाकडे बघते. तेव्हा मी तिला सांगते की तुला मोठी होऊन साईंटिस्ट होशिल.', हे बोलल्यानंतर आलिया खुप हसली. तिच्या चाहत्यांनी तिचे खुप कौतुक केले. त्यामुळे आता आलिया तिच्या लेकीला अभिनेत्री बनवणार नाही तर शास्त्रज्ञ करणार आहे. आता आलियाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे.

काहीवेळापुर्वी आलिया आणि रणवीर यांनी मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणुन दिसले. येथे दोघांनी वधू-वरांच्या लूकमध्ये रॅम्प वॉक केले.

'रॉकी आणि राणीची प्रेमकथा' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती यात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.

धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम 18 स्टुडिओजद्वारे केली जाते.

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. हा चित्रपट यावर्षी 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT