Alia Bhatt
Alia Bhatt Instagram
मनोरंजन

Mahesh Bhatt यांची मुलगी असूनही आलिया रोज शाळेत मुलांकडून उधार मागायची पैसे, डिमांड असायची 5 रुपयाचीच..वाचा

प्रणाली मोरे

Alia Bhatt: आलिया भट्ट ही प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राझदान यांची मुलगी. त्यामुळे अर्थातच तिचं बालपण सुखवस्तू उपभोगण्यात गेलं असणार हे नक्की. आता हे असं एकदंरीत माहित असल्यावर कोणाला पटेल की आलिया भट्ट लहानपणी शाळेत रोजच्या खाऊसाठी शाळेतल्या मुलांकडून पैसे उधार घ्यायची...आणि तिची डिमांड फक्त 5 रुपयाची असायची..

याचा खुलासा स्वतः आलिया भट्टने एका कार्यक्रमात केला होता. चला जाणून घेऊया आलिया शाळेत न चुकता रोज मुलांकडून 5 रुपये का घ्यायची?

आलियाचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.ज्यात आलिया भट्ट एका टी.व्ही रिअॅलिटी शो मध्ये गेस्ट म्हणून हजर राहिली आहे. त्या शो मध्ये तिच्यासोबत तिची आई सोनी राझदानही उपस्थित राहिलेल्या दिसत आहेत. तसंच, विकी कौशलही मंचावर दिसतोय. कदाचित त्यांच्या 'राझी' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा हा एक जुना व्हिडीओ असावा.

फराह खान त्या शो ची परिक्षक म्हणून त्या व्हिडीओत दिसत आहे. आलिया मंचावर गेल्यावर फरहा तिला शाळेच्या काही जुन्या आठवणींविषयी विचारते. तेव्हा आलिया आपली आई सोनी राझदानला तू मला पैसे कुठे द्यायचीस...म्हणून मला शाळेत इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागायचे असं म्हणताना दिसतेय.

यावर फराह म्हणते,''महेश भट्ट यांची मुलगी असूनही तुला पॉकेटमनी मिळायचा नाही''. तेव्हा जोरात नकारात्मर मान हलवत आलियानं पुढचा किस्सा सांगितला.

आलिया म्हणाली,''मला आई कधीच शाळेत असताना खर्चासाठी पॉकेटमनी द्यायची नाही. आणि लहान असताना मला वडापाव प्रचंड आवडायचा. पण तो खाण्यासाठी कधीच माझ्याजवळ पैसे नसायचे. कारण मला शाळेत रोज घरातून डब्बा यायचा..आणि सक्त ताकीद मिळायची तो डबा पूर्ण संपवायची. आता मी डब्बा स्टुडंट होते म्हणून मला घरातून खाण्यासाठी असे पैसे वेगळे दिले जायचे नाहीत. पण मला तर वडापाव खायचा असायचा..मग मी शक्कल लढवायचे''.

''वर्गातील मुलांकडून खासकरून ५ रुपये मागायचे. यावर आलियाला विचारलं जातं की,'पण तुला ते पैसे परतही द्यावे लागत असतील मग काय करायचीस?',

आलिया म्हणाली,''हो...परत द्यावे लागू नयेत म्हणूनच मी मुलींकडून नाही तर मुलांकडून पैसे घ्यायची..म्हणजे परत नाही दिले तरी चालायचे''. असं आलियानं म्हटल्यावर तिथे उपस्थित सोनी राझदान थोड्या शॉक दिसल्या पण बाकी सगळ्या उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT