Alia Bhatt is wearing a saree that has the entire Ramayana depicted on it through motifs  SAKAL
मनोरंजन

Alia Bhatt at Ayodhya Ram Mandir: एका साडीचं 'रामायण'! अयोध्या सोहळ्यासाठी आलियाच्या विशेष लूकचं कौतुक

आलिया भटने अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा आहे

Devendra Jadhav

Alia Bhatt at Ayodhya Ram Mandir: अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले होते.

दोघांनी पारंपारिक कपडे परिधान केले होते. रणबीर - आलिया दोघेही दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत मुंबई विमानतळाबाहेर दिसले.

रणबीरने धोती कुर्ता घातला होता. तर आलियाच्या पारंपरिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. सध्या आलियाच्या या साडीची सगळीकडे चर्चा आहे.

(Alia Bhatt is wearing a saree that has the entire Ramayana depicted on it through motifs)

आलिया - रणबीर या दोघांच्या साध्या तरीही आकर्षक पोशाखाचं सगळीकडे कौतुक होतंय. आलियाने या सोहळ्यासाठी रामायणाच्या चित्राची डिझाइन असलेली साडी परिधान केली होती. साडीच्या बॉर्डरवर रामायणातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील एका यूजरला हे लक्षात आलं. आणि त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की, "आलिया भट्टने साडी नेसली आहे, ज्यामध्ये रामायणाशी संबंधित सर्व घटना साडीवर चित्रित केल्या आहेत".

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या सोहळ्याला राजकीय उच्चभ्रू तसेच प्रमुख हिंदू धार्मिक नेते आणि भारतभरातील सेलिब्रिटी उपस्थित होते.

या सोहळ्यात रणबीर आणि आलियासह सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, राम चरण, चिरंजीवी, कतरिना कैफ, विकी कौशल हे सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

आलियाचा पती रणबीर कपूर तिच्यासोबत अयोध्येत आहे. रणबीर त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटात श्रीरामाची भूमिका साकारत आहे. 'दंगल' आणि 'बावल' सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक नितेश तिवारी हा चित्रपट बनवत आहेत.

या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहेत. याआधी आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार होती. पण आता तिच्याजागी साई पल्लवीची रामायणमध्ये एन्ट्री झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT