Alia Bhatt Pregnant News | Alia Bhatt News esakal
मनोरंजन

Alia Bhatt Pregnant: आलिया - रणबीरच्या घरी हलणार पाळणा? फोटो शेयर

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया - रणबीरच्या गुड न्युजची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आलिया - रणबीरच्या गुड न्युजची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. त्याचे कारण त्यांनी काही वेळेपूर्वी सोशल मीडियावर शेयर केलेला फोटो. त्या फोटोमुळे येत्या काही दिवसांत आलियाच्या घरी पाळणा हलणार अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. आलियानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो फोटो शेयर केल्यानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आलिया आणि रणबीरचं लग्न मुंबईतील आर के थिएटमध्ये झालं होतं. त्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते.(Alia Bhatt Pregnant News)

आलियाच्या गुड न्युजची बातमी कळताच तिच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. आता कपूर कुटुंबियांच्या घरात लवकरच पाळणा हलणार असून त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा या शब्दांत नेटकऱ्यांनी आलियाचं कौतूक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर हे त्यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी चर्चेत आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. याशिवाय रणबीरच्या शमशेराचा ट्रेलरही व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. (Alia Bhatt News)

रणबीर आणि आलियाचं लग्न हा सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय होता. त्यानंतर आता त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन हा देखील दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाबरोबरच रणबीरच्या ब्रम्हास्त्रची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. रणबीरच्या ब्रम्हास्त्रमध्ये मीडियाला मिळालेल्या वृत्तानुसार शाहरुख खान प्रमाणेच दीपिका पदूकोणही 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. दीपिका या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका वेबसाईटनं दावा केलाय की रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दीपिका पदूकोणची धमाकेदार एन्ट्री असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT