Alia bhatt Ranbir Kapoor Sakal
मनोरंजन

Alia - Ranbir Daughter : इटुकले पाय, पिटुकले हात...; आलिया-रणबीरच्या छोट्या परीची पहिली झलक!

दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर यांच्या लेकीचा लूक व्हायरल आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर हे नुकतेच आई बाबा झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच आलिया भटने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या मुलीची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोड्यांपैकी एक असलेल्या रणबीर आणि आलियाची जोडी कायम चर्चेत असते. या दोघांनी आपल्या लेकीचं नाव राहा असं ठेवलं आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी या दोघांचेही चाहते खूप उत्सुक आहेत. आता ही उत्सुकता काहीशी कमी झाली आहे. राहा पहिल्यांदाच आलिया रणबीरसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

आलिया रणबीरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्यांच्यासोबत त्यांची लेक राहासुद्धा दिसत आहे. या फोटोत आलिया आणि रणबीर राहाला घेऊन कुठेतरी जात आहेत. आलियाने राहाला कडेवर घेतलं आहे. तिने गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत.

इन्स्टंट बॉलिवूड आणि विरल भयानी या इन्स्टाग्राम पेजने हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये राहाचे चेहरा स्पष्ट दिसत नाही. पण तिचे छोटेसे हात पाय दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत ती तिच्या बाबागाडीमध्ये बसलेली दिसत आहे. हे पाहूनही चाहते खूप खूश झाले आहेत. आता तिचा चेहरा बघण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT