alia and karan johar
alia and karan johar  esakal
मनोरंजन

Ranbir Alia wedding: आलियाच्या हातावर मेंहदी पाहून करणला आलं रडू!

सकाळ ऑनलाईन टीम

Alia bhatt Ranbir Kapoor Mehandi Ceremony- आलिया रणवीरच्या लग्नानं (bollywood celebrity) अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चेनं अनेकांना धक्काही दिला आहे. थोडयावेळापूर्वी रणबीरचे चुलते रणधीर कपूर यांनी उद्या रणबीरचं लग्न (bollywood news) होणार नसल्याचे सांगुन वऱ्हाडी (Ranbir kapoor) मंडळींना कोड्यात टाकले आहे. त्यामुळे उद्या आलिया रणबीरचं शुभमंगल होणार की नाही असा प्रश्न या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना पडला (Alia bhatt) आहे. साधारण दोन ते तीन वर्षांपासुन आलिया - रणबीरच्या लग्नाची चर्चा होत होती. त्यामध्ये कोरोनामुळे या दोन्ही सेलिब्रेटींनी घरातच लग्न (karan johar) केल्याचेही बोलले गेले. दरम्यानच्या काळात रणबीरचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर (rishi kapoor) यांचे निधन झाल्यानं कपूर कुटूंबियांवर शोककळा पसरली होती.

आलिया रणबीरचं लग्न आर के स्टुडिओमध्ये होणार असून त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहे. आपल्या लग्नाचे कोणत्याही प्रकारे लाईव्ह इव्हेंट शेयर होणार नाहीत याची योग्य ती काळजीही घेण्यात आली आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना आणि तिचा पती विकी कौशल यांनी घेतली होती. आता आलिया रणबीरनं लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना फोटो काढण्यास मनाई केली आहे. त्यांनी फोटो काढू नये म्हणून त्यांच्या मोबाईला खास कव्हरही लावण्यात आले आहे. लग्न झाल्यावर तो कव्हर काढण्यास सांगितले आहे. यासगळ्या नुकताच आलियाचा मेंहदी सोहळा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं आलियाच्या मेहंदी सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. आलियाच्या हातावर मेहंदी पाहून करण कमालीचा भावूक झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी शेयर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये करणला अश्रु अनावर झाल्याचे दिसून आले आहे. करणनं सर्वात प्रथम आलियाला मेहंदी लावली. याप्रसंगी करिना कपूर खान, करिश्मा कपूर, अयान मुखर्जी उपस्थित होते. आलिया - रणबीरच्या लग्नबाबत चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT