Alia Bhatt Reaction On Pathaan Success Google
मनोरंजन

Pathaan ने तोडला 'ब्रह्मास्त्र'चा रेकॉर्ड; ५ व्या मिनिटाला समोर आली आलियाची प्रतिक्रिया,म्हणाली..

बॉक्सऑफिसवर दर दिवशी 'पठाण' कमाईच्या बाबतीत अनेक सिनेमांचे रेकॉर्डे ब्रेक करताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Alia Bhatt Reaction On Pathaan Success: मनोरंजन सृष्टीत सध्या सगळीकडे एकच चर्चा रंगलेली दिसत आहे..ती म्हणजे पठाणची. केवळ बॉक्सऑफिसवरच 'पठाण' राज्यकरताना दिसत नाही तर लोकांच्या मनावरही 'पठाण'चेच राज्य दिसत आहे. २५ जानेवारी रोजी 'पठाण' सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम अभिनित या सिनेमानं अनेक रेकॉर्ड ब्रेक करत नवीन रेकॉर्ड कायम केले आहेत.(Alia Bhatt Reaction On Pathaan Success)

बॉक्सऑफिसवरील कमाईत पठाणनं अनेक सिनेमांना पिछाडीवर टाकलं आहे. यादरम्यान आलिया भट्टनं आता शाहरुख खानच्या यशावर प्रतिक्रिया दिलीआहे. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी, आलिया भट्ट आणि वरुण धवन झी सिने अॅवॉर्ड्स २०२३ संबंधित एका कार्यक्रमात हजर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. आणि 'पठाण' ला मिळणाऱ्या यशावरही त्या दोघांनी बातचीत केली.

'पठाण'ला मिळणाऱ्या यशावर प्रतिक्रिया नोंदवताना आलिया म्हणाली,''आम्हाला खूप आनंद होत आहे की 'पठाण' फक्त ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलेला नाही तर भारतीय सिनेमातील सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेला आहे''.

आपल्या या वक्तव्यानंतरआलियानं तिथं उपस्थित सगळ्यांना टाळ्यांचा गजरात 'पठाण'चं कौतूक करायला सांगितलं.

आलिया भट्ट पुढे म्हणाली,''पठाणला जे यश मिळालंय त्यासाठी मला किती आनंद होतोय हे वेगळं सांगायला नको आणि मी प्रार्थना करते देवाकडे की हे असे दिवस सारखे पहायला मिळू देत''.

आलिया नंतर वरुण धवननं 'पठाण'मुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला.

यादरम्यान आलियाला प्रश्न विचारला गेला की,'पठाणने ब्रह्मास्त्रचा रेकॉर्ड तोडला आहे यावर तू काय बोलशील?', तेव्हा आलिया म्हणाली,''प्रत्येक येणाऱ्या सिनेमाला आधीच्या सिनेमाचा रेकॉर्ड तोडायला हवा..मला खूप आनंद झाला आहे याक्षणी''.

शाहरुखचा 'पठाण' रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्सऑफिसवर तगडी कमाई करताना दिसला होता. सिनेमाला रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. आणि प्रत्येक दिवशी सिनेमा जबरदस्त कमाई करताना दिसत आहे.

मंगळवारी ३१ जानेवारी रोजी यशराज फिल्म्सने इन्स्टाग्रामवर 'पठाण'च्या वर्ल्डवाईड कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत,ज्यानुसार सिनेमानं जगभरात ५९१ करोडचा व्यवसाय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT