aaliya 
मनोरंजन

ट्रोलिंगवर आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली ''गेल्या काही दिवसांमध्ये...''

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलीवूडशी संबंधित अनेक मुद्दे चर्चेत होते. मग तो नेपोटिझमचा मुद्दा असो किंवा मग एनसीबीचा ड्रग प्रकरणाचा मुद्दा. या सगळ्या प्रकरणांमध्ये सोशल मिडियावर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल केलं गेलं. त्यांच्या फोटोपासून ते पोस्टपर्यंत सगळ्याच बाबतीत हे सेलिब्रिटी ट्रोलर्सच्या निशाण्यावर होते. परिणामी सेलिब्रिटींनी सततच्या ट्रोलिंगमुळे त्यांच्या पोस्टवरील सेटिंग बदलत त्यावरील कमेंट्स सेक्शन बंद ठेवलं होतं. इतकंच नाही तर काही सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर येणं कमी केलं तर काहींनी सोशल मिडियालाच रामराम ठोकला. ट्रोलर्सनी अभिनेत्री आलिया भट्टला घराणेशाहीच्या मुद्द्यावर खूप ट्रोल केलं. नुकत्याच एका मुलाखतीत आलियाने यागोष्टीवर दुःख व्यक्त केलं.

यॉर स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टने गेल्या काही दिवसातील घटनाक्रमांवर चर्चा केली. आलियाने सांगितलं की गेले काही महिने तिच्यासाठी सोपे नव्हते. यासोबतंच आलियाने देखील सांगितलं की तिने कसं तिच्या कामाचं स्वरुन बदललं. आलियाने सांगितलं की, ''मला याची जाणीव झाली आहे की आम्हाला एकमेकांप्रती आणि या जगाप्रती संवेदनशीलता असण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मी खूप तिरस्कार पाहिला आहे आणि या कारणामुळे मला हे समजलं की लोकांप्रती थोडी सहानुभुती आणि संवेदनशीलतापासून आपण खूप पुढे जाऊ शकतो.''

आलियाने सांगितलं की ''ऑनलाईन ट्रोलिंग आणि निगेटीव्हीमध्ये जी एक गोष्टी यावर्षी मला मिळाली ती म्हणजे प्रेम. गेल्या ८ महिन्यांमध्ये मला तुम्हा चाहत्यांकडून खूप प्रेम मिळालं आहे. जेव्हा आपण कमजोर असतो तेव्हा तुम्ही त्या लोकांजवळंच जाता ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता.''   

alia bhatt reveals her biggest takeaway for this year says that she has seen a lot of hate  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT