मनोरंजन

'सडक 2' चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा

संतोष भिंगार्डे

मुंबई: दिग्दर्शक महेश भट यांचा सडक २ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र तो कोणत्या तारखेला येणार याबाबत प्रस्नचिन्ह निर्माण झाल होते. मात्र २८ ऑगस्टला हा चित्रपट डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. आलिया भटने ही माहिती आपल्या सोशल मीडियावर दिली आहे.

महेश भट यांनी १९९१  मध्ये सडक हा चित्रपट बनविला होता. यामध्ये संजय दत्तची मुख्य भूमिका होती. आता त्याचाच सिक्वेल सडक २ हा चित्रपट बनविला आहे. हा चित्रपट तयार आहे आणि आता चित्रपटगृहे बंद असल्यामुळे तो ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे.

याबाबत निर्माते मुकेश भट म्हणाले, मी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे कारण नजीकच्या काळात थिएटर्स पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सध्या चित्रपट प्रदर्शनाचा हा एकमेव मार्ग आहे. आमच्यासाठी हा नवीन प्लॅटफॉर्म आहे आणि तो उत्तम आहे.

 "सडक २" या चित्रपटात आलिया भट्ट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर सोबतच पूजा भट्ट, जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियांका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार  आहेत.

(संपादनः पूजा विचारे)

Alia Bhatt shared poster Sadak 2 digital release date

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT