alia bhatt  Sakal
मनोरंजन

Alia Bhatt: आधी डिलिट पुन्हा शेअर...रणबीर-राहाचा फोटो रिपोस्ट करुन आलिया ट्रोल

आलिया भट्ट इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते हे सर्वांनाच माहीत आहे.

Aishwarya Musale

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण जगत आहे. गेल्या वर्षी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एका मुलीचे पालक झाले आणि तेव्हापासून दोघेही अनेकदा त्यांच्या मुलीबद्दल बोलताना दिसले. आलिया आणि रणबीरने आत्तापर्यंत मुलगी राहाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही.

आलिया भट्ट इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते हे सर्वांनाच माहीत आहे. त्याचवेळी तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरचे सोशल मीडियावर कोणतेही अकाउंट नाही. म्हणजेच तो इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर नाही. अशा परिस्थितीत आलिया कधीतरी आपली मुलगी राहा हिचे फोटो जगाला दाखवेल या आशेवर प्रत्येकजण आहे.

आलिया भट्टने काल रात्री एक फोटो शेअर केला आहे. फोटोत रणबीर कपूर त्याची मुलगी राहासोबत दिसत आहे. राहा बेबी स्ट्रॉलरवर आहे आणि रणबीर तिच्यावर प्रेम करत असल्याचे दिसते. मात्र, राहाची झलक दिसत नाही कारण ती आलियाने मागून क्लिक केली होती. फोटो शेअर करताना आलियाने लिहिले की, "मला वाटते की मी 6 नोव्हेंबरपासून सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर बनले आहे."

तुम्ही पाहत असलेला फोटो यापूर्वी आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव तिने लगेचच तो फोटो काढून टाकला. डिलीट करूनही राहा आणि रणबीरचा हा फोटो फॅन पेजवरून व्हायरल झाला. अनेक फॅन पेजेसनी हा फोटो शेअर केला आहे. यानंतर आलियानेही हा फोटो पुन्हा शेअर केला आहे.

आलिया भट्टने पुन्हा फोटो शेअर केल्यावर अनेक युजर्सनी कमेंट केली.एका युजर्सने कमेंट केली, "लोकांना माहित आहे की तुम्ही आत्ताच हा फोटो शेअर केला होता." आलिया रणबीरच्या एका फॅन पेजने कमेंट केली आहे की, मी हा फोटो तुमच्या अगोदर पोस्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT