Alia Bhatt post for Ranbir Kapoor Esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor Birthday: "तुझं सिक्रेट सोशल मिडीया अकाऊंट..", हटक्या अंदाजात आलियानं दिल्या रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Vaishali Patil

Alia Bhatt shares birthday post for Ranbir Kapoor: बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आज 28 सप्टेंबरला 41 वर्षांचा झाला. रणबीर कपूरने वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या टीझर रीलीज करत चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. सध्या 'अ‍ॅनिमल'च्या टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तर रणबीरचा वाढदिवस असल्यामुळे त्याचे चाहतेही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. रणबीरची पत्नी आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

आलिया भट्टने तिच्या Instagram हँडलवर काही फोटो शेअर करत रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यासोबतच तिने एक मजेदार आणि रोमँटिक कॅप्शन देखील शेयर केले आहे. आलिया आपल्या लाडक्या नवऱ्यासाठी लिहिते की, “माझे प्रेम.. माझा सर्वात चांगला मित्र.. माझे आनंदाचे ठिकाण.. जसं की तू माझ्या शेजारी बसून तुझ्या सिक्रेट अकाउंटवरुन हे कॅप्शन वाचत आहेस. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी… तू हे सर्व जादुई बनवतोस."

सध्या आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्या पोस्टला कमेंट करत रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये आलियाने दोघांचे अनेक अनसीन फोटो पोस्ट केले आहेत. रणबीर आलियासोबत सेल्फी काढत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्यासमोर उभे राहून क्रिकेट स्टेडियममध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. तर दोन रणबीरचे सोलो फोटो आहेत.

एक फोटो आलियाच्या मेहेदी समारंभातील तर शेवटचा फोटो रणबीरचा क्लोज-अप आहे जो दक्षिण आफ्रिकेतील आहे जिथे त्याने आलियाला प्रपोज केले होते.

'रॉकस्टार', 'तमाशा', 'बर्फी' आणि 'संजू' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने छाप सोडणार रणबीर हा आता वेगळ्या धाटणीच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT