Alia Bhatt Wishes ‘Soon to be Dadi’ Neetu Kapoor On Her Birthday sakal
मनोरंजन

आलीयाने सासूला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाली होणाऱ्या आजीला..

अभिनेत्री आलिया भटची सासू म्हणजे नीतू कपूर यांचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

neetu kapoor birthday : एके काळी ऋषी कपूर (rushi kapoor) यांच्या काही चित्रपटांतून बॉलीवूड गाजवणारी नीतू कपूर ही ऋषी यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी सोशल मीडियावर सक्रिय झाली. त्यांच्या मृत्यूनंतर नीतू कपूरने स्वत:ला सावरण्यासाठी टिव्ही आणि सोशल मीडियाचा आसरा घेतला. रडण्याऐवजी नीतूने स्वत:ला व्यस्त करत सावरण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेकांनी त्यांना ट्राेलही केले पण नीतू (neetu kapoor) यांनी सगळ्यांने सडेतोड उत्तर देत काम सुरु ठेवले. अशा बिनधास्त नीतू कपूर यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने सूनबाई आलिया भट हिने आपल्या सासूला खास शुभेच्छा दिल्या आहे.

(Alia Bhatt Wishes Soon to be Dadi Neetu Kapoor On Her Birthday)

अभिनेत्री नीतू कपूर आता 65 व्यय वर्षात पदार्पण करत आहेत. विविध रिअलिटी शो, रणबीर- आलियाचं लग्न आणि नुकतीच आलियानं दिलेली गोड बातमी यामुळे नीतू कपूर गेली काही दिवस सतत चर्चेत असतात. अगदी त्यांच्या चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणीही अनेक पापाराजी त्यांना भेटायला गेलेले जातात. त्यामुळे नीतू यांच्या वाढदिवशी चाहत्यांकडून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण यामध्ये आलियाने दिलेल्या शुभेच्छांची सर्वाधिक चर्चा आहे.

alia bhatt birthday wishes to neetu kapoor

नीतू कपूर यांच्या मुलगा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधली. याच लग्नातील हळदीचा फोटो शेयर करत आलियाने शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत आलिया आणि नीतू कपूर यांचे प्रेम दिसून येत आहेत. 'जगातील सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी सासू, माझी मैत्रीण आणि लवकरच होणाऱ्या आजीला खूप सारं प्रेम' असे कॅप्शन आलियाने दिले आहे. आलिया सध्या आई होणार असल्याने या शुभेच्छा विशेष आहे. सध्या नीतू कपूर लंडन मध्ये आपल्या लेकीच्या घरी म्हणजे रिद्धिमा कपूरच्या घरी वाढदिवस सेलेब्रेट करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT