Alia Bhatt Sakal
मनोरंजन

Filmfare Awards: 68व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 16 नामांकनं मिळवणाऱ्या आलियाचं नाणं वाजेल का खणखणीत?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.

Aishwarya Musale

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील खूप चर्चेत असते.

आलियाने तिच्या अभिनयाचा झेंडा सर्वत्र फडकवला असला तरी चाहत्यांनाही अभिनेत्रीच्या चित्रपटांची खात्री पटली आहे. अलीकडेच, 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये आलियाने देखील या यादीत स्थान मिळवले आहे.

फिल्मफेअर पुरस्कार हा चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध पुरस्कार आहे. आता नुकतेच या पुरस्कारासाठीचे नामांकन जाहीर करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी सलमान खान, आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल एकत्र हा अवॉर्ड फंक्शन होस्ट करणार आहेत.

अहवालानुसार, आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण यासह दहा नामांकने मिळवली आहेत, तर विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स देखील रिंगणात आहे. त्याच वेळी, ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा सारखे चित्रपट देखील या वर्षातील सर्वाधिक नामांकित चित्रपटांमध्ये आहेत.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या वर्षी विकी कौशलपासून टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर आणि अगदी गोविंदापर्यंत, अनेक सेलिब्रिटीज त्यांच्या डान्स नंबरसह फिल्मफेअरच्या मंचावर धमाल करतील. चाहतेही या अवॉर्ड फंक्शनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आता आलियाच्या नॉमिनेशनमुळे तिच्या चाहत्यांना आणखी आनंद झाला आहे. कामाबद्दल बोलायचे झाले , अभिनेत्री पुढे करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर कपूरही तिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT