मनोरंजन

Heart Of Stone Trailer: 'हिरो नही व्हिलन'! आलियाची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री..'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर रिलिज...

Vaishali Patil

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन केल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज आहे. नुकताच तिच्या मोस्ट अवेटेड हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो सध्या सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे.

हा आलियाचा पहिला हॉलिवूड सिनेमा असून यात ती हिरोईनची नव्हे तर व्हिलनची भुमिका साकारणार आहे. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

आलिया भट्ट या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. हार्ट ऑफ स्टोनची व्यतिरिक्त गॅल गॅडोट ही एका गुप्त एजंटची भूमिका साकारत आहे ज्यासाठी तिच्या ध्येयालाच सर्वकाही समजते. ती तिचे मिशन पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करते.

आलिया भट्टनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 'हार्ट ऑफ स्टोन'चा ट्रेलर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फक्त काही सीन्समध्ये दिसली होती. मात्र, खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या आलियाची भुमिका यातही प्रभावी दिसत आहे.

चित्रपटाचं पार्श्वसंगीतही चांगलचं आहे. हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल. आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. तिच्या आधी प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये काम केलं आहे. आता आलियानं तिच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. विषेश आलिया भट्टने गरोदरपणातही या चित्रपटाचं शूट केले होते. या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलिया ब्राझीलला गेली होती. या चित्रपटाच्या दुसऱ्या स्टारकास्टसोबत त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे.

या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया भट्टकडे धर्मा प्रॉडक्शनचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट आहे. ज्यात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT