Alka Yagnik had been leaving separately from her husband Neeraj for 27 years sakal
मनोरंजन

Alka Yagnik Birthday: 'या' कारणामुळे लग्नानंतर २७ वर्षे पतीपासून दूर राहिल्या अल्का याग्निक..

ज्येष्ठ गायिका अलका याग्निक यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने पाहूया ही खास बात..

नीलेश अडसूळ

alka yagnik birthday: आपल्या सुमधूर आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अल्का याग्निक यांचा आज, २० मार्च रोजी ५७ वा वाढदिवस.

'प्यार की झंकार', 'मेरे अंगने में' यांसारख्या गाण्यांपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अल्का यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि आजपर्यंत त्यांनी दोन हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.

केवळ हिंदीच नाही तर इतर विविध १५ भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. व्यावसायिक आयुष्यात अल्का याग्निक फारच यशस्वी ठरल्या. पण हे यश संपादन करण्यासाठी त्यांना बरेच त्याग करावे लागले. अल्का त्यांनी १९८९ मध्ये शिलाँगचे व्यावसायिक नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर त्या २७ वर्षे पतीपासून लांब होत्या. जाणून घेऊया त्यांच्या अनोख्या नात्याची ही गोष्ट..

(Alka Yagnik had been leaving separately from her husband Neeraj for 27 years)

अलका आणि नीरज यांचा प्रेम विवाह आहे. ते एकमेकांना रेल्वे स्टेशनवर भेटले होते. मग त्यांच्यात ओळख, मग मैत्री आणि पुढे प्रेम झाले. पुढे त्यांनी हे गोष्ट घरच्यांना सांगितली आणि ते विवाह बंधनात अडकले. मात्र लग्न करूनही दोघे एकत्र येऊ शकले नाहीत.

कारण, नीरज यांचा संपूर्ण व्यवसाय हा शिलाँगमध्ये होता आणि अल्का यांचं काम मुंबईतून होतं. करिअरसाठी दोघांनाही एकमेकांपासून लांब राहावं लागलं. मात्र या अंतरामुळे या दोघांच्या प्रेमात काही समस्या आल्या नाही.

उलट त्यांचं नातं अधिक दृढ झालं. व्यवसायातून जसा वेळ मिळेल तसं नीरज मुंबईला अल्का यांना भेटायला यायचे. अल्का यांनी त्यांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारीसुद्धा स्वत:च पूर्णपणे स्वीकारली.

याबाबतीत अल्का एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, "नीरज यांनी मुंबईत व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते एका छोट्या शहरातून आले होते आणि मुंबईत त्यांना जम बसवता आला नाही. इथे व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना भरपूर आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे अखेर मीच त्यांनी शिलाँगमध्ये राहून व्यवसाय करा, असा सल्ला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Drug Inspector Exam Paper Leak : नीट नंतर आता MPSC चाही पेपर फुटला? औषध निरीक्षक भरती वादाच्या भोवऱ्यात, विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप

आंदोलन आहे म्हणजे लाठीचार्ज करा असं नाही; पोलीस कारवाईवरून सरन्यायाधीशांनी सुनावलं, दिले शिस्तीचे धडे

Latest Marathi News Live Update : 'विद्यार्थ्यांच्या हिताचे विधेयक भरकटवू नका'; काँग्रेसला किरेन रिजिजू यांचे आवाहन

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी २० कोटींचं पॅकेज? CSK ने दोन खेळाडूंच्या अदलाबदलीसह Mumbai Indiansला दिली भारी ऑफर

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! महालक्ष्मी येथे स्वयंचलित पादचारी पूल खुला होणार, २० मिनिटांचं अंतर कमी होणार

SCROLL FOR NEXT