alka yagnik 
मनोरंजन

लग्नानंतर २७ वर्षे पतीपासून दूर होत्या अल्का याग्निक; काय होतं कारण?

स्वाती वेमूल

आपल्या सुमधूर आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अल्का याग्निक यांचा आज (२० मार्च) ५५ वा वाढदिवस. 'प्यार की झंकार', 'मेरे अंगने में' यांसारख्या गाण्यांपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अल्का यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि आजपर्यंत त्यांनी दोन हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. केवळ हिंदीच नाही तर इतर विविध १५ भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. व्यावसायिक आयुष्यात अल्का याग्निक फारच यशस्वी ठरल्या. पण हे यश संपादन करण्यासाठी त्यांना बरेच त्याग करावे लागले. अल्का त्यांनी १९८९ मध्ये शिलाँगचे व्यावसायिक नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर त्या २७ वर्षे पतीपासून लांब होत्या. 

पतीपासून लांब राहण्यामागचं कारण
नीरज यांचा संपूर्ण व्यवसाय हा शिलाँगमध्ये होता आणि अल्का यांचं काम मुंबईतून होतं. करिअरसाठी दोघांनाही एकमेकांपासून लांब राहावं लागलं. मात्र या अंतरामुळे या दोघांच्या प्रेमात काही समस्या आल्या नाही. उलट त्यांचं नातं अधिक दृढ झालं. व्यवसायातून जसा वेळ मिळेल तसं नीरज मुंबईला अल्का यांना भेटायला यायचे. अल्का यांनी त्यांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारीसुद्धा स्वत:च पूर्णपणे स्वीकारली. 

याबाबतीत अल्का एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, "नीरज यांनी मुंबईत व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते एका छोट्या शहरातून आले होते आणि मुंबईत त्यांना जम बसवता आला नाही. इथे व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना भरपूर आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे अखेर मीच त्यांनी शिलाँगमध्ये राहून व्यवसाय करा, असा सल्ला दिला."
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT