Dilip Joshi Shailesh Lodha 
मनोरंजन

'जेठालाल-तारक मेहता'मध्ये मोठा वाद; सेटवर धरला अबोला

स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावर अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी, त्यांना खळखळून हसवणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इतकंच नाही तर या मालिकांमधील मैत्रीचे दाखले खऱ्या आयुष्यातही दिली जातात. मात्र आता याच मालिकेतील दोन कलाकारांमध्ये मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे. पडद्यावर एकमेकांचे 'परममित्र' म्हणणारे जेठालाल आणि तारक मेहता यांच्यात हा वाद झाल्याचं समजतंय. या वादामुळे जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा हे सेटवर एकमेकांपासून दूरच राहत असल्याचं कळतंय. 

एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार दिलीप जोशी आणि शैलेश लोढा हे फक्त शूटिंगपुरतंच एकमेकांशी बोलत आहेत. सीन संपताच दोघंही आपापल्या व्हॅनिटीमध्ये जाऊन बसतात आणि मग एकमेकांसमोरही येत नाहीत. या दोघांमध्ये जरी वाद असला तरी पडद्यावर ते कधीच दिसू नये यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. दोघांमध्ये नेमका वाद कोणत्या कारणामुळे झाला, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र दोघंही कामाप्रती एकनिष्ठ असल्याने त्यावर कधीच वादाचा परिणाम होऊ देत नाहीत. 

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका जवळपास गेल्या तेरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. इतक्या वर्षांत मालिकेतील काही भूमिका बदलल्या असल्या तरी ठराविक भूमिका मात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेने नुकतेच ३००० एपिसोड्स पूर्ण केले आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT