allahabad high court stay on broadcast of al jazeera documentary india who lit the fuse and seeks answers from state and cetral government sakal
मनोरंजन

India Who Lit the Fuse : ‘हू लिट द फ्यूज?’ च्या प्रसारणावर कोर्टाची बंदी

अल जजिरा मीडिया नेटवर्क प्रा. लि. वाहिनीला नोटीस बजावत उत्तर मागितले

सकाळ वृत्तसेवा

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : ‘इंडिया...हू लिट द फ्यूज?’ (India Who Lit the Fuse) या वादग्रस्त माहितीपटाच्या प्रसारणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या माहितीपटाच्या प्रसारणामुळे देशातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असे न्यायालयाने सांगत बंदी घातली. या चित्रपटाचे कतारच्या अल जजिरा वाहिनीवरून प्रसारण केले जाणार होते. यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाली होती.

न्यायाधीश अश्‍विनीकुमार मिश्रा आणि न्यायाधीश आशुतोष श्रीवास्तव यांच्या दोन सदस्यीय पीठाने आदेश दिला आहे. अल जजिरा मीडिया नेटवर्क प्रा. लि. वाहिनीला नोटीस बजावत उत्तर मागितले आहे.

तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच देशातील आणि राज्यातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलावीत असे निर्देशही केंद्र आणि राज्य सरकारला दिले. या खटल्याची पुढची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे. केंद्र सरकार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने योग्य ती खबरदारी घेण्याचेही सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT