दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याने आपले एक हटके छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रात अल्लु अर्जुन (Allu Arjun) दाढी, डोळ्यांवर काळा चष्मा, गळ्यात साखळी, लेदर ब्लॅक जॅकेट आणि रेड प्रिंटेड शर्ट घालून हातात सिगार घेतलेला दिसत आहे. आता अभिनेत्याने जेव्हा नवीन फोटो शेअर केला, तेव्हा चाहते चकित झाले आहेत. त्यांनी विचारले की हा लूक 'पुष्पा २' चा आहे का? अभिनेता शेवटचा 'पुष्पा : द राईज' या चित्रपटात दिसला होता. (Allu Arjun Share His New Look Photo Fans Says Is This Pushpa 2)
दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अल्लूने रश्मिका मंदाना हिच्याबरोबर काम केले होते. चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर बनला आहे. यात अल्लूने पुष्पाची भूमिका केली होती. (Bollywood News)
छायाचित्र व्हायरल
दक्षिण चित्रपटात अल्लू अर्जुन हा वेगळी ओळख असलेला अभिनेता आहे. २९ जुलै रोजी त्याने एक छायाचित्र शेअर केले आहे. त्यात तो एखाद्या बाॅसपेक्षा कमी दिसत नाही. किलर एक्स्प्रेशन्सवर चाहते फिदा झाले आहेत. चाहते त्यावर म्हणाले, यंदाही पुष्पा फायर आहे, फ्लावर नाही. फोटोबरोबर अल्लू अर्जुनने कॅप्शनमध्ये सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.