Allu Arjun look viral  esakal
मनोरंजन

Allu Arjun : 'अजुनही मला...' इंडस्ट्रीमध्ये २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अल्लु भावूक!

स्टावर देखील अल्लु अर्जुनच्या नावाचा बोलबाला आहे. टॉलीवूडमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे.

सकाळ डिजिटल टीम

Allu Arjun tollywood actor share emotional post : टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल्लु अर्जूनची गोष्टच वेगळी आहे. त्याच्या पुष्पा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. बॉक्सऑफिसवर प्रचंड कमाई करत या चित्रपटानं बॉलीवूडचा तगडे आव्हानही दिले होते. येत्या काही दिवसांत त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

केवळ अभिनयच नाहीतर डान्स, अनोखी आणि हटके स्टाईल यामुळे देखील अल्लु अर्जून नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. इंस्टावर देखील अल्लु अर्जुनच्या नावाचा बोलबाला आहे. टॉलीवूडमध्येच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील त्याचा चाहतावर्ग प्रचंड आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

अल्लु अर्जुननं त्याला टॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये वीस वर्षे पूर्ण झाली असून त्यानं त्यानिमित्तानं एक खास पोस्ट शेयर केली आहे. यावेळी त्यानं मनातल्या भावनांना शब्दरुप दिले आहे. त्या पोस्टवर त्याच्या हजारो चाहत्यांनी त्याच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्याच्या दुसऱ्या पार्टची चाहते बऱ्याच काळापासून प्रतिक्षा करत आहेत.

अल्लु अर्जुन त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, चित्रपट विश्वातील माझ्या प्रवासाला आज वीस वर्षे पूर्ण झाली आहे. माझ्या या प्रवासामध्ये प्रेक्षकांचा,चाहत्यांचा मोठा वाटा आहे. जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहे. अजुन मोठा प्रवास बाकी आहे.

चाहत्यांच्या प्रेमामुळेच आजवरचं यश आहे. त्यांच्यामुळेच मी आहे. आजवर त्यांनी दाखवलेल्या निखळ प्रेमानं मी घडलो आहे. त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो अशी पोस्ट करत अल्लु भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT