Alt Balaji Name And Logo Change Ekta Kapoor,Shobha Kapoor Resign
Alt Balaji Name And Logo Change Ekta Kapoor,Shobha Kapoor Resign Google
मनोरंजन

Alt Balaji युजर्ससाठी मोठी बातमी,आधी एकता कपूर पडली बाहेर, आता कंपनीचा हैराण करणारा निर्णय..

प्रणाली मोरे

Alt Balaji : प्रसिद्ध निर्माती एकता कपूर सध्या तिची ओटीटी कंपनी ऑल्ट बालाजी मुळे चर्चेत आली आहे. ती आणि तिची आई शोभा कपूरनं कंपनीच्या प्रमुख पदावरनं राजीनामा दिला आहे.

एका प्रेस रीलिजद्वारे याची माहिती देण्यात आली होती. आता कंपनीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे जो ओटीटी App चं नाव आणि लोगोशी संबंधित आहे.(Alt Balaji Name And Logo Change Ekta Kapoor, Shobha Kapoor Resign)

आता ऑल्ट बालाजीचं नाव बदलण्यात आलं आहे. इथून पुढे हे नाव ALT Balaji नसून ALTT हे करण्यात आलं आहे. ज्याची माहिती कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर देण्यात आली आहे. तसंच,या अॅपचा लोगोही बदलण्यात आला आहे.

कंपनीच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत या लोगोची नवी झलक दाखवण्यात आली आहे. जुन्या लोगोपेक्षा नवीन लोगो खूपच आकर्षक दिसत आहे. या लोगोवर आधी ऑल्ट बालाजी लिहिलेलं होतं आता ALTT असं लिहिलेलं आहे.

कंपनीनं लोगो शेअर करत लिहिलं आहे की,''ALT Balaji आता ALTT झालं आहे. नवा चकाचक स्टायलिश लूक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा नवा लोगा प्रेक्षकांना अधिक मनोरंजन देण्याच्या आमच्या वचनाशी आम्हाला कटिबद्ध ठेवेल''.

काही दिवसांपूर्वी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून कंपनीनं सांगितलं होतं की एकता कपूर आणि शोभा कपूर यांची कंपनीतून बाहेर पडण्याची प्रोसेस गेल्या एक वर्षापासून सुरू होती. आता अधिकृतरित्या याची घोषणा करत आहोत की दोघींनीही कंपनीच्या पदांचा राजीनामा दिला आहे. आणि आता विवेक कोका यांची नवे चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माहितीसाठी सांगतो की, ऑल्ट बालाजीची सुरुवात १६ एप्रिल २०१७ रोजी एकता कपूरची प्रॉडक्शन कंपनी बालाजी टेलिफिल्म्सकडून करण्यात आली होती. लोकांमध्ये या अॅपची बरीच चर्चा त्यावेळी झाली होती. आणि बऱ्यापैकी प्रसिद्धि देखील मिळाली होती.

या अॅपवर जास्तकरुन इरॉटिक वेबसिरीज दाखवल्या जातात, ज्यामध्ये 'गंदी बात','बेकाबू','क्राइम अॅन्ड कन्फेशन' सारख्या काही प्रसिद्ध सिरीजची नावं घेता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Hyderabad Couple: आधी 'गूगल'वरून घेतली आयडिया अन् मग केला गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला; वाचा डोकं सुन्न करणारा प्रकार

Ahmednagar News : सहा आमदारांना खासदारकीची लॉटरी; जिल्ह्यातील १४ आमदारांनी लढवली लोकसभा

SCROLL FOR NEXT