Amar Singh Chamkila Teaser:  
मनोरंजन

Amar Singh Chamkila Teaser: 'पंजाबवर राज्य अन् भर स्टेजवर 30 गोळ्या झाडून हत्या...' अमरसिंहच्या 'चमकिला' चा टीझर रिलिज

Vaishali Patil

पंजाबी गायक अमरसिंग चमकीला वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि हिंसाचारामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला आणि त्याच्या पत्नीला एका गायकाने गोळ्या घातल्या. अमरसिंह चमकिला यांची गाणी त्यांच्या विरोधकांना आवडली नाहीत.

भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंग चमकीला हे त्यांच्या काळात पंजाबी संगीतातील एक मोठं नाव होतं. 8 मार्च 1988 रोजी त्यांची हत्या झाली. वयाच्या 27 व्या वर्षी त्याची निर्घृण हत्या केली. आता हिच भयानक कहानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता चित्रपट निर्माते इम्तियाज अली अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर चरित्र तयार करत आहेत. दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा हे इम्तियाज अलीच्या आगामी बायोपिक 'चमकिला'मध्ये चर्चेत आहेत. दिवंगत पंजाबी लोक गायक अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

आज 'चमकिला'च्या फर्स्ट लूक टीझरचे रिलिज करण्यात आला. लोकगायक म्हणून दिलजीतचा हा लूक समोर आला होता.

टीझर शेअर करताना दिलजीतने लिहिले, "जो नाम सालों से आपके दिल और दिमाग पे छाया है वो अब आपके सामने आया है. पंजाबचा सर्वाधिक विक्रमी विक्री करणारा कलाकार अमर सिंग #चमकिला यांची अनटोल्ड कथा पहा, लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर!"

अमरसिंग चमकिला यांनी 80 च्या दशकात त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल, मद्यपान, अंमली पदार्थांचा वापर आणि पंजाबी पुरुषांची पितृसत्ताक मानसिकता यावर भाष्य करणाऱ्या गाण्यांनी प्रसिद्धी मिळवली. तो खुप वादात असायचा. वादग्रस्त असलं तरी त्यांनी रातोरात प्रसिद्धी मिळवली. पंजाबमधील मेहसमपूर येथे 1988 मध्ये चमकिला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांची हत्या करण्यात आली होती.

चमकिला: इम्तियाज अलीच्या बायोपिकमधील अमर सिंग चमकिला म्हणून दिलजीत दोसांझचा लूक पहिल्या टीझरमध्ये रिलिज होताच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT