Viral VIdeo Esakal
मनोरंजन

Viral VIdeo: ऐश्वर्याची आराध्या-करिनाचा तैमूर अन् शाहरुखचा अबराम! अंबानी शाळेच्या वार्षिक सोहळ्याला स्टार किड्सची हवा

अबराम, तैमूर-आराध्याच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Vaishali Patil

नुकताच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहरुख खान, करीना कपूर, शाहिद कपूर, ऐश्वर्या राय बच्चन या सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांनी परफॉर्म केले. सध्या सोशल मिडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची नेहमीच चर्चा असते. काल अंबानी शाळेत वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहरुख खान, करीना कपूर, शाहिद कपूर, ऐश्वर्या राय बच्चन अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांनी डान्स करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. पण सध्या सोशल मिडियावर ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्याची सर्वात जास्त चर्चा आहे.

आराध्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी आराध्याने उत्तम अभिनय केला आणि डान्सही केला. इतक्या लहान वयात आराध्याचे टॅलेंट पाहून लोक तिचे खुप कौतूक करत आहेत. यात आराध्या तिच्या आईसारखीच दिसत आहे. यावेळी आराध्याची आई ऐश्वर्या राय बच्चन तिचा व्हिडिओ शुट करताना दिसली.

तर दुसरीकडे शाहरुख खानचा मुलगा अबराम देखील डान्स करताना दिसला. कार्यक्रमादरम्यान एका नाटकात त्याने अभिनय केला. सर्वात महत्वाच म्हणजे त्याने आपल्या वडील शाहरुख खानची सिग्नेचर पोझही दिली.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये अबराम खान स्टेजवर अभिनय करताना दिसला. त्याने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हे गाण्यावर डान्स केला. दरम्यान, करीना कपूरचा मोठा मुलगा तैमूरही स्टेजवर पांढऱ्या रंगाचा कुर्ता परीधान करून 'बर्फी' चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसला.

तैमूर खानचा डान्स व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT