Ameen Sayani 
मनोरंजन

Ameen Sayani: बहनों और भाइयों... रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपला; अमीन सयानी यांचे निधन

Ameen Sayani Demise : अमीन सयानी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

priyanka kulkarni

Ameen Sayani: रेडिओच्या जगातील आवाजाचे जादूगार अशी ओळख असणारे ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमीन यांचा मुलगा रझील सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

अमीन सयानी यांचे मंगळवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

अमीन सयानी यांच्या पार्थिवावर उद्या (22 फेब्रुवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत.आज त्यांचे काही नातेवाईक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत.

जाणून घ्या अमीन सयानी यांच्याबद्दल...(Know About Ameen Sayani)

अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनात घर करून गेली. अमीन सयानी यांनी आपल्या कारकिर्दीला ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथून रेडिओ प्रेजेंटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमीन सयानी यांनी 54,000 हून अधिक रेडिओ कार्यक्रम केले आहेत. त्यांनी जवळपास 19,000 जिंगल्सना आवाज दिला.

'बिनाका गीतमाला' कार्यक्रमामुळे मिळाली लोकप्रियता

रेडिओ सिलोन आणि त्यानंतर विविद भारती वर तब्बल 42 वर्षे चाललेल्या 'बिनाका गीतमाला' या त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'गीतमाला' या कार्यक्रमामुळेच अमीन यांना लोकप्रियता मिळाली.

सयानी यांनी अनेक चित्रपटांमध्ये रेडिओ निवेदक म्हणून काम केलं. यात भूत बांगला, तीन देवियां, बॉक्सर आणि कटल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

Latest Live Updates Marathi : 'पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं'; प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

SCROLL FOR NEXT