Ameesha Patel On Vikram Bhatt: Esakal
मनोरंजन

Ameesha Patel: 'त्यामुळे माझं करिअर उद्ध्वस्त झालं..', विक्रम भट्टच्या रिलेशनशीपवर अमिषा शेवटी बोललीच..

Vaishali Patil

Ameesha Patel On Vikram Bhatt: 'कहो ना प्यार है' या ब्लॉकबस्टर अमिषा पटेलने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

त्यानंतर तिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले त्यात 'गदर' आणि 'भूल भुलैया' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही तिने दमदार भुमिका केली.

मात्र हिट सिनेमे देवुन देखील ती इंडस्ट्रीत तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होती.

ती अजूनही सिंगल आहे. मात्र तिच्या डेटिंग आणि रिलेशनशीपच्या बातम्या बऱ्याच गाजल्या. त्यातच विक्रम भट्टसोबतच्या तिचं नातही खुपच गाजलं.

दोघेही एकमेंकाच्या प्रेमात दंग होते. अमिषा आणि विक्रम भट्ट यांनीही त्यांच्या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला होता.

मात्र काही काळानंतर ते नातं तुटलं. आता ब-याच वर्षांनंतर अभिनेत्रीने स्वतः विक्रम भट्टसोबतच्या नात्याबद्दल चर्चा केली आहे.

याबद्दल बोलतांना तिने सांगितले आहे की त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिक चर्चांचा फटका तिच्या करिअरला झाला.

आता अमिषा पटेलने विक्रम भट्टसोबतच्या नात्यावर मौन सोडले आहे.

ती म्हणाली, 'मी बनवलेल्या दोनच नात्यांचा माझ्या करिअरवर परिणाम झाला. यानंतर 12-13 वर्षे मला वाटलं की आता कोणाचीही गरज नाही. मला फक्त शांतता हवी आहे, मला माझ्या आयुष्यात दुसरे काहीही नको आहे.'

त्याचबरोबर तिने बॉलिवूड इंडस्ट्रीवरही टिका केली आहे. ती म्हणते की, 'मुलगी सिंगल असणं हे तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांच्यासाठी अधिक अर्थपुर्ण आहे. जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एखाद्याला डेट करत असाल तर ते तुमच्या करिअरसाठी फायदेशीर आहे, असं त्यांना वाटतं. माझ्यासाठी हे प्रकरण नव्हतं, यामुळे मला खुप त्रास झाला आहे, मात्र मी त्यातून शिकलो आहे.'

'आप मुझे अच्छे लगने लगे' या चित्रपटादरम्यान अमीषाची विक्रम भट्टची भेट झाली होती. त्यावेळी विक्रम भट्ट हा विवाहित होता.

पण काही काळानंतर मैत्रीनंतर अमिषा त्याच्या प्रेमात पडली होती. विक्रम भट्ट त्यावेळी अमिषापेक्षा वयाने मोठे होते.

दोघांनी जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यांचे नाते टिकले नाही, नंतर दोघेही वेगळे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT