Ameesha Patel Reveals Kareena Backed Out Of 'KNPH' Because Of Rakesh Roshan Esakal
मनोरंजन

Ameesha Patel: करिना खोट बोलतेय! कहो ना...प्यार है' बद्दल अमीषाचा मोठा खुलासा

Vaishali Patil

Ameesha Patel On Kareena Khan:बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'गदर 2' रिलीज होऊन 3 आठवड्यांहून अधिक दिवस झाले असले तरीही या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे.

त्यात कालच या चित्रपटाच्या टिमने मुंबईत जोरदार सक्सेस पार्टीही दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमिषा ही लाईमलाईटपासून लांब होती. तिचे चित्रपट देखील काही खास कमाल करत नव्हते. त्यानंतर तिने गदर 2 मधुन कमबॅक केले आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला.

अमीषाने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हा पहिला सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला होता. या चित्रपटातील तिची आणि हृतिकची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली. मात्र 'कहो ना प्यार है' साठी अमिषा ही पहिली पसंती नव्हती. तर या चित्रपटासाठी निर्मात्यांना करीना कपूरला घ्यायचे होते.

करीना कपूर खान हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र मीडियानुसार तिची आई बबिता करिनाच्या या प्रोजेक्टबद्दल शंका होती. त्यामुळे करिनाने हा चित्रपट नाकारला आणि त्यात अमिषाची एंट्री झाली. मात्र आता अमिषा पटेलने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, करीनाने चित्रपट सोडला नव्हता तर तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले होते.

याबाबत अमिषा पटेलला विचारले असता तिने सांगितले की, राकेश रोशन यांनी तिला सांगितले की, त्यांनी करीनाला हा चित्रपट सोडण्यास सांगितले कारण त्यांच्यात मतभेद होते. हृतिकची आई पिंकी देखील आश्चर्यचकित झाल्या होत्या कारण चित्रपटाचा सेट तयार होता, त्यांच्यावर करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना पुढील तीन दिवसांत या चित्रपटासाठी दुसरी सोनिया शोधायची होती.

या मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या चित्रपटामागची कहानी सांगितली. राकेश रोशन यांनी तिला एका लग्नात पाहिले होते. त्यानंतर त्यांनी अमीषाच्या आई-वडिलांना आपल्या मुलासह तिला लॉन्च करण्याची इच्छा व्यक्त केली होती.दुसऱ्या दिवशी त्याने अमिषाच्या कुटुंबीयांना डिनरसाठी बोलावले आणि अमिषाला चित्रपटाचा काम करण्यासाठी विचारणा केली. या चित्रपटाचे शूटिंगही येत्या ३ दिवसांत सुरू होणार होते.

अमीषाने सांगितले की, नंतर जेव्हा तिने चित्रपट साइन केला तेव्हा तिला या सर्व गोष्टींची कळाल्या. त्यानंतर करीना आणि अमिषाच्या भांडणाची बरीच चर्चा झाली. करीना आणि अमिषाच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांच्यात भांडण झाल्याची बरीच चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT