amey wagh on kachha badam
amey wagh on kachha badam sakal
मनोरंजन

लग्नानंतरही अमेय वाघ म्हणतोय, ललना न भेटली हवी तशी..

नीलेश अडसूळ

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या परखड (Marathi Entertainment) प्रतिक्रियेसाठी देखील ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याचा झोंबिवली (zombivli) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार अशी विचारणा कलाकारांना सुरु केली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित झोंबिवलीला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली आहे. नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अमेयनं सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अमेय वाघ हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच अमेयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमेय हा गाडीत बसून ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील एक गाणे गुणगुणत असल्याचे दिसत आहे. ते गाणे आहे 'ललना न भेटली हवी तशी'.. आता अमेयचे लग्न होऊनही त्याने या गाण्यावर ताल का धरला असेल बरं असा प्रश्न पडतो. त्याचे कारणही खासच आहे. त्याने या गाण्यावर रिल्स बनवा असे त्याच्या चाहत्यांना सुचवले आहे. पण हे करताना तो 'कच्चा बदाम' या ट्रेंडिंग गाण्यावरही भाष्य केले आहे.

“कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की मराठी गाण्यांवरच चांगले reels बनवता येतात! “मी वसंतराव” चा तिसरा आठवडा सुरु! लवकर बघा!”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे. हे कॅप्शन काहीसी हटके आणि खोचकही आहे. म्हणजे एकीकडे कच्चा बदाम या गाण्याचं पेव आलेलं असताना मराठी गाण्यांना रिल्स साठी वापरणंही फार गरजेचं आहे. त्याचा व्हिडीओ आणि ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ (mi vasantrao) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असून एका संगीतमय जगात घेऊन जाणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातून केवळ वसंतरावांची सांगीतिक बाजू नाही तर माणूस म्हणून ते किती समृद्ध होते त्याचेही दर्शन घडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT