ameya khopkar, uddhav thackeray 
मनोरंजन

'तेव्हा सरकारचे निर्बंध कुठे होते?'; नाट्यगृहांवरून अमेय खोपकरांचा सवाल

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेला चिमटे

स्वाती वेमूल

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेला चिमटे

कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली. तर दुसरीकडे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. 'षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अमेय खोपकरांचं ट्विट-

'षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक ५० टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही. इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का,' असा परखड प्रश्न खोपकरांनी विचारला आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. यंदा तो माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात घेतला जाणार आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहांसाठी राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या. त्यानुसार, चित्रपटगृहे, नाट्यगृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरू करण्यास परवानगी असेल. दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवावे, चित्रपटगृहांमध्ये मोकळ्या जागांमध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असून, सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मास्क बंधनकारक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचा मार्गही मोकळा झाला आहे. मात्र, मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ६-६ फुटांवर खुणा करून त्यानुसार आसन व्यवस्था करावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT