Amir Khan,Kiran Rao Google
मनोरंजन

आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकत्र!

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे कळाले की....

प्रणाली मोरे

आमिर खानचं(Amir Khan) पहिलं लग्न हे रीना दत्तासोबत साल १९८६मध्ये झालं. दोघांचा सुखाचा संसार होता,छान दोन मुलं होती. सारं काही आलबेल सुरू होतं. पण दुधात मिठाचा खडा पडावा आणि सबंध दुध नासावं तसंच काहीसं आमिर आणि रीनाच्या संसाराचं झालं. सगळं छान सुरू आहे असं वाटत असतानाच आमिरने आपल्या भरल्या संसाराला मोडण्याचा निर्णय घेतला. साल २००२ मध्ये रीना दत्ता आणि आमिर विभक्त झाले. पण त्यानंतर रीना आमिरच्या फिल्म प्रॉडक्शनमध्ये कार्यरत राहिली. कामानिमित्तानं ते एकत्र दिसायचे. घटस्फोटानंतर तब्बल ३ वर्षांनतर आमिरने किरण रावशी लग्न केलं. किरण राव आणि आमिरचं सुत 'लगान'च्या शूटिंगवेळी जुळल्याच्या बातम्या आहेत. किरण राव ही त्यावेळी आशुतोष गोवारीकरला दिग्दर्शनात सहकार्य करीत होती.

Amir Khan,Reena Dutta,Kiran Rao

किरण मुळतः हुशार होती आणि त्यामुळेच म्हणे आमिर तिच्याकडे आकर्षित झाला अशी चर्चा त्यावेळी होती. आणि तिथनंच मग हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे मग बातमी समोर आली की रीना दत्ता आणि आमिरचा घटस्फोट होण्यामागचं मूळ कारण किरण राव होती. अखेर २००५ मध्ये किरण आणि आमिरने लग्न केलं. दोघांनी मिळून त्यानंतर खूप सिनेमांसाठी एकत्र काम केलं. अनेक सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशन याचा महत्त्वाचा दाखला. किरण राव स्वंतत्र दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरमध्ये उभी राहिली ती आमिरच्या मदतीमुळेच. यांना पुढे सरोगसी पद्धतीचा अवलंब करून एक मुलगा झाला,ज्याचं नाव या दोघांनी 'आझाद' ठेवलं. पण आझाद आठ-नऊ वर्षांचा होतोय नं होतोय तेच आमिर आणि किरणनंही विभक्त व्हायचा निर्णय घेतला.

२०२० मध्येचे आमिर आणि किरणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ एकत्रित पोस्ट करून त्यांच्या फॅन्सना ही दुःखाची बातमी सांगितली. त्या व्हिडिओत आमिरने म्हटलं होतं,''आम्हाला माहिती आहे हे ऐकून तुम्हाला दु:ख होईल. पण मी आणि किरणने यापुढे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही पती-पत्नी नसलो तरी आमचं कुटुंब एकच आहे. आम्ही कुटुंब म्हणून कायम एकत्र असू. एकमेकांसोबत असू पण फक्त पती-पत्नी नसू''. आझाद किरण रावसोबत राहतो. असं असलं तरी किरण आणि आमिर मात्र घटस्फोटानंतर अनेक ठिकाणी मुलगा आझादसोबत एकत्र दिसले. इतकंच काय तर आमिरच्या आगामी 'लालसिगं चड्ढा' सिनेमाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी किरण रावनेच सांभाळली. त्यांच्या पाणी फाऊंडेशन या संस्थेचं कामही ते एकत्रित येऊन पाहतात. असंच आता ते एकत्र आले ते मुलगा आझादच्या १०व्या वाढदिवसाच्या निमित्तानं. सोशल मीडियावर आमिर-किरण आणि आझादचे बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो-व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यात हे तिघे एकत्रितपणे बर्थ डे सेलिब्रेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. किरणचा यातील न्यू हेअर कट आणि काही केसांना तिने केलेला ब्ल्यू कलरही तिला शोभून दिसतोय.

'दंगल गर्ल' फातिमा शेखमुळे आमिर-किरणचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सध्या रंगल्यात. आमिर फातिमाशी लग्न करणार अशाही वावड्या उठल्यात. फातिमाने यावर बाजू मांडली असली तरी आमिरची चुप्पी चर्चांना शांत करत नाहीय. असो,किरण राव आणि आझाद सोबतचं नातं मात्र आमिर सध्या एन्जॉय करत असल्यामुळे अजूनतरी आमिर किरणपासून विभक्त होताना बोलला होता त्यावर ठाम आहे हे ही नसे थोडके.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT