Amir Khans three different looks from Laal Singh Chaddha 
मनोरंजन

आमिरचे एकाच सिनेमात तीन वेगळे लुक, पाहा फोटो

वृत्तसंस्था

मुंबई : 2020 हे वर्ष प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे कारण, मनोरंजनाची मेजवानी त्यांना मिळणार आहे. एका मागोमाग एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागिल वर्षी 2019 मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानचा एकही चित्रपट रिलिज नव्हता. पण, यावर्षी तो एका दमदार सिनेमासह सज्ज झाला आहे. जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा. विशेष म्हणजे या सिनेमामध्ये आमिर तीन वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. 

आमिर खान आणि करीना कपूर लवकरच एका चित्रपटामधून एकत्र दिसणार आहेत. 'लाल सिंह चढ्ढा' असं त्या बहुचर्चित सिनेमाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील करीनाचा फर्स्ट लुक लिक झाला आणि इंटरनेटवर व्हायरलही झाला. आता मात्र शुटिंगदरम्यानचा आमिर खानच्या फर्स्ट लुक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. लाल सिंग चढ्ढाच्या भूमिकेतला आमिरचा लुक दमदार आहे.

या सिनेमासाठी आमिर वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. कधी दाढीमध्ये, कधी पगडीमध्ये तर, कधी क्लीन शेवमध्ये तो दिसला. पण क्लिन शेवनंतर आता तो पुन्हा लांब दाढीमध्ये स्पॉट झाला. त्यामुळे नक्की सिनेमाचा प्लॉट काय आहे याची उत्सुकता चाहत्यांमध्ये लागून आहे. एकुण सिनेमामध्य़ए आमिरचे तीन वेगळे लुक पाहायला मिळणार आहेत. 

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर वर्षातून मोजकेच सिनेमे करतो पण ते बॉक्सऑफिसवर धमाका करतात. आमिरने 2018 मध्ये 'थग्स ऑफ हिंदुस्तान' हा शेवटचा सिनेमा केला पण, तो सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर यावर्षी आमिर 'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमातून दिसणार आहे.  

'लाल सिंह चढ्ढा' हा सिनेमा 'फॉरेस्ट गम्प' या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. यामध्ये आमिरसोबत मुख्य भूमिकेत करीना कपूर खान दिसणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. हा सिनेमा यावर्षीच्या ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT