Amisha Patel Gadar 2 Actress Sunny Leonie Summoned esakal
मनोरंजन

Gadar 2 : उधारी न दिल्याबद्दल अमिषाला मिळाली नोटीस!

अमिषा सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्गही मोठा आहे.

युगंधर ताजणे

Amisha Patel Gadar 2 Actress Sunny Leonie Summoned : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल ही तिच्या अभियनयापेक्षा बाकीच्या गोष्टींमुळेच जास्त चर्चेत येत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील तिला तिच्या स्वभावामुळे नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहूणी म्हणून अमिषाला निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी तिनं त्या संयोजकाकडून पैसे घेतले होते. मात्र त्यांची फसवणूक केल्याची तक्रार तिच्या विरोधात देण्यात आली होती.

अमिषा सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्गही मोठा आहे. काही दिवसांपासून अमिषा ही तिच्या गदर चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमुळे चर्चेत आली आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. सनी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला होता. तब्बल दोन दशकानंतर त्याचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

यासगळयात अमिषा मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एका निर्मात्याकडून उसने घेतलेले पैसे वेळेत पूर्ण न दिल्यानं तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय तिला नोटीस देखील पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोशिएनने अमिषा पटेल आणि सनी लिओनी या दोन्ही अभिनेत्रींना नोटीस पाठवली आहे. त्यात या दोन्ही सेलिब्रेटींनी २५ जुलै पर्यत कार्यालयात येण्यास सांगितले आहे.

अमिषानं पैसे परत न देण्याचा आरोप आहे तर तिनं एका निर्मात्याकडून पैसे घेतले असून ते अद्याप परत केलेले नाही. दुसरीकडे सनीनं निर्मात्याकडून पैसे घेऊन तो चित्रपट सोडल्यानंतर पैसे परत केलेले नाहीत. असे आरोप करण्यात आले आहेत. एकीकडे अमिषाचा गदर २ हा चर्चेचा विषय असताना अमिषाच्या विरोधात आलेल्या तक्रारीनं नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. असोशिएशनच्या वतीनं त्यांना नोटीस देखील धाडण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना असोशिएशनकडे फिल्ममेकर्स हरीश पटेल आणि विनोद बच्चन यांनी तक्रार केली आहे. यानंतर असोशिएशननं त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले आहे. २५ जुलै रोजी उपस्थित न राहिल्यास या दोन्ही अभिनेत्रींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT