Amitabh Bachchan Google
मनोरंजन

Amitabh Bachchan: अमिताभसाठी संजीवनी ठरला होता केबीसी शो.. मात्र बिग बी यांनी शो करु नये असं जया बच्चनना वाटत होतं..

सिनेमात काम मिळण बंद झालं होतं तेव्हा हताश झालेल्या अमिताभ बच्चन यांना केबीसी शो नं पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan: २००० साली जेव्हा अमिताभ बच्चन यांनी टी.व्हीवरचा प्रसिद्ध क्वीझ शो 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करण्यास सुरुवात केली तेव्हा ते एक सुपरस्टार होते ,ज्यांनी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी मोठं पाऊल उचललं होतं. कितीतरी लोकांना वाटलं की अमिताभ यांचा हा निर्णय चुकीचा आहे. पण त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासाठी तो शो म्हणजे चॉइस नव्हती..तर त्यांची गरज होती.

अमिताभ यांच्या अनेक जवळच्या लोकांनी त्यांना हा शो करण्यास नकार दिला..त्यामध्ये त्यांची पत्नी जया बच्चन या देखील सामिल होत्या. (Amitabh Bacchan: when jaya bachchan asked amitabh bachchan to not do kaun banega crorepati)

अमिताभ बच्चन यांना 'कौन बनेगा करोडपती' या शो चा चेहरा मानलं जातं. इतरही अनेक स्टार्सनी हा शो होस्ट करण्याचा प्रयत्न करुन पाहिला पण अमिताभ सारखी छाप कोणीच सोडू शकलं नाही. अशामध्ये जर तुम्हाला कळेल की अमिताभ यांची तेव्हा ती गरज होती अन्यथा त्यांनी हा शो केला नसता. कारण जया बच्चन यांना मुळीच वाटत नव्हते की अमिताभनी केबीसी शो होस्ट करावा..तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल आणि यामागचं कारण काय असू शकतं..याचे अनेक तर्क आपण लावाल.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

२००८ मध्ये अबु जानी आणि संदीप खोसला यांना दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांना केबीसी विषयी प्रश्न विचारला गेला होता की,'या शो नं रातोरात अमिताभ बच्चन यांचे नशीब कसे बदलवले..'.

हैराण झालेल्या जया बच्चन उत्तर देत म्हणाल्या,'तुम्ही हा विचार करू शकत नाही की मी तेव्हा सुरवातीला नकार दिला होता. मला तर वाटत नव्हतं की त्यांनी हा शो करावा'. जेव्हा जया बच्चन यांना याचे कारण विचारले तेव्हा म्हणाल्या,'मला फक्त वाटत होतं की हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी योग्य नाही. ते खूप मोठे सुपरस्टार आहेत,मोठ्या पडद्यावर त्यांनी काम केले आहे,तर छोट्या पडद्यावर काम करणं त्यांच्यासाठी योग्य नाही. पण या शो मधून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली'.

२०२१ मध्ये जेव्हा अमिताभ बच्चननी १००० वा एपिसोड शूट केला होता,तेव्हा ते खूप भावूक झाले होते. त्यांनी म्हटलं होतं की-''जवळ-जवळ २१ वर्ष झाली. २००० साली या प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यावेळी मला माहित नव्हतं..सगळे लोक म्हणत होते..तुम्ही टेलीव्हिजन करताय,मोठ्या पडद्यावरनं छोट्या पडद्यावर येताय..तुमच्या इमेजला नुकसान पोहोचेल. पण त्यावेळी वेळ अशी होती की सिनेमात काम मिळत नव्हतं. पण पहिला भाग शो चा प्रसारित झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या रिअॅक्शन मिळाल्या त्या पाहून वाटलं की जणू जग मुठीत आलंय''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींनी पुट्टापर्थी येथील भगवान श्री सत्य साईबाबांचे पवित्र मंदिरात महासमाधीचे दर्शन घेतले आणि आदरांजली अर्पण केली

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT