amitabh bachchan  Team esakal
मनोरंजन

अब तक 52 ! बिग बी हेच बॉलीवूडचे 'शहेनशहा'

अमिताभ यांच्या वाट्याला आलेली प्रसिध्दी क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला आली असावी.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये काही कलाकार असे आहेत की ज्यांची लोकप्रियता ही वर्षानुवर्षे वाढत आहे. त्या सेलिब्रेटींच्या वाढत्या वयाबरोबर त्यांची लोकप्रियताही वाढलेली दिसून येते. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या बॉलीवू़डमधल्या (bollywood) करिअरला ५२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अमिताभ यांचा चाहतावर्ग पसरला आहे.(amitabh bachchan 52 years in bollywood industry share photo on instagram)

अमिताभ (amitabh bachchan) यांच्या बॉलीवूडमधील पाच दशकांच्या कामगिरीनिमित्तानं त्यांना बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी म्हणून अमिताभ बॉलीवूडमध्ये प्रसिध्द आहेत. एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्याकडे आहे. अजूनही ते बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये आहे. कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर बिग बी यांनी मोठा प्रवास केला आहे. त्यांच्या ५२ (52 years journey) वर्षाचा प्रवास त्यांनीही त्या पोस्टव्दारे मांडला आहे.

अमिताभ यांच्या वाट्याला आलेली प्रसिध्दी क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला आली असावी. ज्यांनी अमिताभ यांच्याबरोबर अभिनयाला सुरुवात केली होती ते कलाकार पडद्यापासून केव्हाच लांब गेले आहेत. मात्र अमिताभ अजूनही बॉलीवूडवर राज्य करत आहेत. त्यांचे चित्रपट मोठी कमाई करत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे बिग बी सध्या त्यांच्या लिखाणातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

बिग बी यांनी सोशल मीडियावर आजच्या दिवसाच्या औचित्यानं एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ५२ वर्षे, तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. अजूनही विश्वास बसत नाही की एवढा मोठा प्रवास झाला. त्यांच्या या पोस्टला आतापर्यत लाखो हिट्स मिळाले आहेत. अमिताभ यांनी 1969 साली सात हिंदुस्थानी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT