Amitabh Bachchan Birthday  
मनोरंजन

Amitabh Bachchan Birthday : काय आहे 'बिग बी' यांच्या यशाचे सिक्रेट? बच्चन यांनी कधीही त्यांच्या आयुष्यात....!

गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या अमिताभ यांच्या नावाचा करिष्माच वेगळा आहे.

युगंधर ताजणे

Amitabh Bachchan Bollywood Actor Happy Birthday : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाची क्रेझच वेगळी आहे. असा एक दिवस जात नाही की त्यादिवशी मुंबईतील बच्चन यांच्या जलसा बाहेर चाहत्यांची गर्दी होत नाही. चाहते हजारोंच्या संख्येनं जलसा बाहेर बच्चन यांना भेटण्यासाठी येतात.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या अमिताभ यांच्या नावाचा करिष्माच वेगळा आहे. दोन पिढ्यां त्यांच्या चित्रपटांनी प्रेरित झाल्या असे म्हटले जाते. अँग्री यंग मॅनची छबी त्यांनी चाहत्यांच्या मनात उमटवली होती. सात हिंदूस्थानी पासून सुरु झालेला प्रवास अजूनही सुरुच आहे. जगभरातील मानाचे पुरस्कार मिळवणाऱ्या अमिताभ यांची यशोगाथा ही नेहमीच नवोदितांना प्रेरणा देणारी ठरली आहे.

अमिताभ यांचे वय आता ८० वरुन ८१ वर्ष झाले आहे.तरीही ते अखंडपणे कार्यरत असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा उंचाई नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटामध्ये अमिताभ यांची भूमिका प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय होती. अमिताभ यांनी नेहमीच्या थाटात आणि उत्साहात त्या भूमिकेला न्याय दिला होता.

उंचाई नंतर आता अमिताभ हे टायगर श्रॉफ सोबत गणपथ नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यात अमिताभ यांची हटके स्टाईल पाहून चाहते भारावून गेले होते. अमिताभ यांनी वयाच्या ८० व्या वर्षी देखील आपण किती फिट आहोत हे दाखवून दिले होते.

Also Read - केवळ स्त्री म्हणून कामाचा मोबदला कमी मिळतो..?

शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबतची मुलाखत हिट ठरली होती....

त्याचे झाले असे की, एका चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ, त्यांचे मित्र प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे एकाच मंचावर होते. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यांनी सांगितले अमिताभ यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच शिस्तीला महत्व दिले. त्याचे फळ त्यांना मिळाले.

मी नेहमीच सेटवर उशिरा पोहचत असे. याउलट अमिताभ हे वेळेच्या अगोदर हजर असायचे. याचा त्यांना फायदाच झाला. मला त्याची काही अंशी किंमत मोजावी लागली. तुमच्यासाठी सारा सेट तयार आहे. बाकीची सगळी मंडळी वाट पाहत आहेत आणि तुम्हीच कित्येक तास गायब आहात. हे चूकीचे आहे. माझ्याबाबत असे झाले. अमिताभ यांनी मात्र नेहमीच वेळेची कदर केली.

अमिताभ यांना त्यांच्या कामाप्रती खूपच जिव्हाळा होता. आपूलकी होती. भारतात फार मी कलाकारांच्या वाट्याला एवढी मोठी लोकप्रियता आली असेल. त्यात अमिताभ यांचे नाव घ्यावे लागेल. वयाच्या या टप्प्यातही त्यांची उर्जा अखंड असल्याचे दिसून आले आहे. सचोटी, प्रामाणिकपणा, आदर आणि प्रेम हे त्यांच्या यशाचे सिक्रेट असल्याचा उल्लेख शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT