Kaun Banega Crorepati 14 esakal
मनोरंजन

Kaun Banega Crorepati 14 : 'पुण्याचा दगडूशेठ अमिताभला पावला! जयाजींनी केला होता नवस, 'गणराया तू फक्त...

काहीही झालं तरी चालेल पण माझ्या अमिताभ यांना बरं करं, त्यांना त्या जीवघेण्या संकटातून मुक्त कर...त्यांना खूप वेदना होत आहेत, त्या वेदना असह्य आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Kaun Banega Crorepati 14: काहीही झालं तरी चालेल पण माझ्या अमिताभ यांना बरं करं, त्यांना त्या जीवघेण्या संकटातून मुक्त कर...त्यांना खूप वेदना होत आहेत, त्या वेदना असह्य आहेत. अशातच तू त्यांना बरं कर...अशी प्रार्थना चाहत्यांबरोबरच प्रसिद्ध अभिनेत्री आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांनी केली देवाकडे केली होती.

अमिताभ यांना कुलीच्या दरम्यान झालेला अपघात यामुळे त्यांनी साऱ्या देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. पुनीत इस्सार यांच्याबरोबरच्या फाईटिंग सीनमध्ये पुनीत यांच्या एका फटक्यानं अमिताभ यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. तो किस्सा अमिताभ यांनी बऱ्याचदा वेगवेगळ्या मुलाखतीतून सांगितला होता. त्यानंतर आता पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ विषयीचा प्रसंग चर्चेत आला आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनी तर अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीला नवस केला होता. काही करुन अमिताभ बच्चन यांना बरं कर असं त्यांनी गणपतीपुढे आराधना केली होती. त्यांच्या या नवसाला दगडुशेठ पावला होता. बिग बॉसच्या १४ व्या पर्वामध्ये जया बच्चन यांनी पुण्यातील दगडुशेठ गणपतीविषयी एक प्रसंग सांगितला आहे.

अमिताभ यांच्याविषयी एवढं सांगण्यामागे कारण म्हणजे नुकतचं अमिताभ यांनी त्यांच्या एका पोस्टमधून मोठा खुलासा केला होता. तो म्हणजे अमिताभ यांना प्रोजेक्ट के च्या दरम्यान एका मोठ्या अपघाताला सामोरं जां लागलं होतं. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापतही झाली होती. आता ते बरे असून त्यांच्या छातीला मार लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही बातमी ऐकून अमिताभ यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

यातच सोशल मीडियावर अमिताभ यांच्याविषयीचे काही किस्से व्हायरल झाले आहेत. त्यात जया बच्चन यांनी पुण्यातील दगडुशेठ गणपतीला जे आवाहन केले होते. त्याविषयी केबीसीमध्ये माहिती दिली होती. जेव्हा अमिताभ यांना कुली चित्रपटाच्या दरम्यान अपघात झाला होता तेव्हा मी दगडुशेठ गणपतीला गेले होते. माझा गणरायावर खूप विश्वास आहे. त्यानं मला या संकटातून बाहेर काढले होते.

बिग बी यांनी सांगितले की, जया बच्चन या जेव्हा पुण्यातील एफटीआयआयमध्ये होत्या तेव्हाच त्यांचा दगडुशेठ यांच्याबद्दलचा विश्वास हा अधिक दृढ झाला होता. जेव्हा जयाजी यांच्या गणेशभक्तीचा विषय येतो तेव्हा त्यात पुण्यातील दगडुशेठच्या नावाचा उल्लेख आल्याशिवाय राहत नाही. असेही अमिताभ यांनी यावेळी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT