Amitabh Bachchan esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात पार पडली अँजिओप्लास्टी

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोकिलाबेन रुग्णालयात बिग बींची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

priyanka kulkarni

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. बिग बी यांना आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची हार्टच्या समस्येमुळे नाही तर पायात क्लॉट झाल्यानं अँजिओप्लास्टी करण्यात आली, असं म्हटलं जात आहे.

बिग बींनी शेअर केलं ट्वीट

बिग बींनी नुकतेच एक ट्विट शेअर केले आहे, यामध्ये त्यांनी लिहिलं,"मी तुमचा सदैव आभारी आहे." अँजिओप्लास्टीनंतर बिग बींनी हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहेत,असा अंदाज हे ट्वीट पाहिल्यानंतर लावला जात आहे.

केबीसीच्या शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत

2022 मध्ये कौन बनेगा करोडपती-14 या शोच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. याबाबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं.

अमिताभ बच्चन यांना दोन वेळा झाला कोरोना

अमिताभ यांनी 2020 मध्ये ट्विट करून माहिती दिली होती की त्यांना कोविडची लागण झाली आहे. त्यांचा मुलगा अभिषेकही पॉझिटिव्ह होता. बिग बी दोन महिने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. नंतर 2022 मध्ये देखील अमिताभ यांनाही कोविडची लागण झाली.

अमिताभ बच्चन यांचे चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.ते प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच बिग बींचा 'गणपत' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT