Amitabh Bachchan Netizens trolled Superstar after his 13 year old tweet on ladies lingerie goes SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan: महिलांच्या इनरवेअरवर अमिताभ बच्चन यांचं ट्विट व्हायरल, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांचं १३ वर्षांपुर्वीचं ट्विट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीय

Devendra Jadhav

Amitabh Bachchan Tweet News: अमिताभ बच्चन वयाची ऐंशी ओलांडून गेली तरीही एकापेक्षा एक चांगल्या सिनेमांमधुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ त्यांचं ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मिडीया अकाऊंट्स स्वतःच सांभाळत असतात.

अमिताभ बच्चन सहसा सोशल मिडीयावर वक्तव्य करुन वाद निर्माण करत नाहीत. पण आता अमिताभ बच्चन यांचं एक जुनं ट्विट व्हायरल झालंय. ज्यात त्यांनी महिलांच्या इनरवेयरवर भाष्य केलंय

(Amitabh Bachchan Netizens trolled Superstar after his 13 year old tweet on ladies lingerie goes)

काय आहे अमिताभ बच्चन यांचं ट्विट

अमिताभ बच्चन यांचे व्हायरल झालेले ट्विट 2010 सालचे आहे, ज्यात त्यांनी एक प्रश्न विचारला होता. त्यांनी ट्विट केलेज होते – इंग्रजी भाषेत ब्रा एकवचनी आणि पँटी बहुवचन का आहेत? या जुन्या ट्विटमुळे अमिताभ बच्चन यांना ट्रोलींगला सामोरं जावं लागतंय.

काहींनी केलं ट्रोलिंग तर काहींचा पाठिंबा

बिग बींच्या या ट्विटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, 'आफ्टर ऑल कोणीतरी महत्त्वाचे प्रश्न विचारत आहे.' तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'चांगला प्रश्न बच्चन सर, केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये विचारा.'

याशिवाय ट्रोल करताना एकाने विचारले- 'हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते.' अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय.

पण याच ट्विटवर काही जण सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना पाठिंबा देत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, प्रश्न इंग्रजी व्याकरणाचा आहे, त्यांनी उदाहरण जरी असं दिलं असलं तरीही हा प्रश्न योग्य आहे

अमिताभ बच्चन यांचं वर्कफ्रंट

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. लवकरच कौन बनेगा करोडपतीचा 15 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा या शोनिमित्ताने बिग बी KBC 15 चे होस्ट म्हणुन समोर येत आहेत.

बिग बींनी काहीच दिवसांपुर्वी चाहत्यांना या शो बद्दल अपडेट दिली आहे. त्यांनी शोच्या सेटवरचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे.

याशिवाय बिग बी KBC व्यतिरिक्त आगामी चित्रपट प्रोजेक्ट के सिनेमाची तयारी करत आहेत. ज्यात त्यांच्यासोबत प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हसन दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT