Amitabh Bachchan on freedom of expression pathan besharam rang controversy at 28th Kolkata International Film Festival  
मनोरंजन

Amitabh Bachchan : 'पठाण' वादावर महानायकही बोलले! म्हणाले, आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर…

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याला मोठ्य प्रमाणात काही लोक विरोध करत आहेत. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये मोठे विधान केले आहे. ते 28व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घटन कार्यक्रमात बोलत होते.

1952 सिनेमॅटोग्राफ कायद्यामध्ये सेंसरशीपचे स्वरूप काय असावे याबद्दल फिल्म सर्टिफिकेशन बोर्डाला निर्देश देण्यात आले आहेत. असे असून देखील आताही नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे बच्चन म्हणाले आहेत.

शाहरूख देखील बोलला...

या कर्यक्रमाला उपस्थित हजारो चाहत्यांसमोर शाहरुख खानने पठाण चित्रपटातील बेशरम इश्क गाण्यावरून सुरू असलोल्या वादावर भाष्य केलं. त्याने त्याच्या मनातील खंत व्यक्त केली आहे. आजकाल आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. आपण भलतेच सकुंचित झालो आहोत असं म्हटलं आहे.

शाहरुख आपल्या त्या भाषणामध्ये म्हणाला की, जे काही होतं आहे त्यामध्ये सोशल मीडियाची भूमिका आपण समजावून घ्यायला हवी. गेल्या काही दिवसांपासून आपण फारच सकुंचित होत चाललो आहोत. त्याचे कारण हा सोशल मीडिया आहे. त्यावर आपण ज्या प्रकारे व्यक्त होतो आहोत त्याचा परिणाम खूपच वेगवेगळ्या रीतीनं होतो आहे. नकारात्मकता सोशल मीडियावर जास्त प्रभाव निर्माण करते. हे विसरुन चालणार नाही.

आपल्याला एक ठाम भूमिका घ्यावी लागते. आपण करत असलेल्या त्या कामाची लोक कशाप्रकारे समीक्षा करतात यावर आपले नियंत्रण नसते. मात्र त्यावरुन जाणीवपूर्वक गोष्टी ठरवल्या जातात की काय असा प्रश्न निर्माण होत असल्याची भीती शाहरुखनं यावेळी व्यक्त केली.

दरम्यान जगप्रसिद्ध कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (KIFF) 28व्या आवृत्तीचे आज उद्घाटन करण्यात आले. 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात 42 देशांतील 52 लघु आणि माहितीपटांसह सुमारे 183 चित्रपट दहा ठिकाणी दाखवले जाणार आहेत. नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्यासह शाहरुख खान देखील सहभागी झाले होते. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बच्चन यांचा अभिमान हा चित्रपट KIFF मध्ये प्रथम प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT