amitabh bachchan on polio campaign advertisement kbc 15 SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan: पोलिओच्या जाहीरातीसाठी अमिताभ बच्चन यांची निवड का करण्यात आली? हे आहे उत्तर

अमिताभ बच्चन यांनी KBC 15 मध्ये त्यांची पोलिओ जाहीरातीसाठी का निवड झाली याचा खुलासा केलाय

Devendra Jadhav

Amitabh Bachchan KBC 15 News: अमिताभ बच्चन हे भारतीय मनोरंजन विश्वातले महानायक. अमिताभ यांनी वयाची ऐंशी ओलांडली असली तरीही आजही मराठी मनोरंजन विश्वात ते सक्रीय आहेत.

अमिताभ सध्या KBC चा पंधरावा सीझन होस्ट करत आहेत. या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांची त्यांची पोलिओ जाहीरातीसाठी निवड का झाली? याचा खुलासा केलाय.

हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धक कुणाल सिंगसमोर अमिताभ यांनी ५० लाखांचा प्रश्न ठेवला. यावेळी त्याने पोलिओची जाहिरात का मिळाली याचा खुलासा केला.

(amitabh bachchan on polio campaign advertisement kbc 15)

म्हणुन अमिताभ बच्चन यांची पोलिओ जाहीरातीसाठी झाली निवड

'कौन बनेगा करोडपती सीझन 15' मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला. अमिताभ KBC मध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि कामाबद्दल अनेक किस्से शेअर करत असतात.

यावेळी अमिताभ यांनी पोलिओ मोहिमेत त्यांना सहभागी का करुन घेतलं याचा खुलासा केलाय. अमिताभ यांनी सांगितले की, पोलिओ मोहिमेच्या दिग्दर्शकाने अमिताभच्या 'अँग्री यंग मॅन' इमेजमुळे त्यांना या मोहीमेत सहभागी करुन घेतले. कारण सर्वसामान्य माणसं त्यांच्या मुलांना लसीकरण करण्याची दिग्दर्शकाची विनंती ऐकत नव्हते.

पोलिओ जाहीरातीचा असाही परिणाम

अमिताभ बच्चन यांनी पोलिओ जाहीरातीच्या मेकर्सने सांगितले की, "तुम्ही लोकांना ओरडा". याशिवाय WHO च्या अधिकाऱ्यांनी भारतातील एका गावाला भेट दिली आणि एका महिलेला विचारले की, तिने आपल्या मुलाला पोलिओची लस का दिली. तेव्हा ती म्हणाली, "अमिताभजींना राग येत होता म्हणून मी माझ्या मुलाला लस दिली."

अमिताभ बच्चन हे 2005 पासून पोलिओ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जोडले गेले आहेत. दरवर्षी ही जाहीरात नवनवीन संदेश घेऊन येते.

अमिताभ बच्चन यांचं वर्कफ्रंट

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर.. अमिताभ सध्या घूमर सिनेमात विशेष भुमिकेत झळकत आहेत

अमिताभ प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत 'कल्की 2898 एडी' मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

याशिवाय अमिताभ 'गणपत'मध्ये टायगर श्रॉफसोबत अहेम भूमिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी अमिताभ यांनी 'उंचाई', 'गुडबाय', 'ब्रह्मास्त्र' सारखे सिनेमे केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

Dombivli News : डोंबिवलीत मराठी तरुणी एकता सावंतच्या शोर्मा गाडीचे उद्घाटन, मराठी मुलगी व्यवसाय करणारच; मनसे तिच्या पाठीशी खंबीर

Mumbai Local: मुंबईतील प्रवाशांना दिलासा! गर्दीच्या वेळी एक्सप्रेस गाड्या थांबणार; लोकल वेळेवर धावण्यासाठी रेल्वेचा कठोर निर्णय

Pune Dive Ghat Traffic Update : दिवे घाटात गुरुवारी तीन तास वाहतूक बंद; रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग

वर्षभरात नाही तर फक्त 40 दिवसांमध्ये पालटणार 'या' राशींचं नशीब ; शनीच्या अस्तामुळे गोल्डन टाईम सुरु !

SCROLL FOR NEXT