Amitabh Bachchan posts 'Bharat Mata ki jai' amid buzz on renaming India vs bharat  SAKAL
मनोरंजन

India VS Bharat 'भारत माता की जय' इंडीया नाव बदलण्याच्या वादात बिग बींची उडी

अमिताभ बच्चन यांनी India VS Bharat या वादात सुचक ट्वीट केलंय.

Devendra Jadhav

संसदेच्या आगामी विशेष सत्रादरम्यान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार भारताचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणू शकते.

सध्या India VS Bharat या मुद्द्यावर मोठा वादंग माजलाय. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनी या वादात उडी घेतलीय. इतकंच नव्हे तर ते कोणाच्या बाजूने आहेत हे सुद्धा त्यांनी ट्विटच्या माध्यमातुन स्पष्ट केलंय.

(Amitabh Bachchan posts 'Bharat Mata ki jai' amid buzz on renaming India vs bharat)

अमिताभ बच्चन यांनी X वर 'भारत माता की जय'चा नारा दिला

18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सरकारकडून भारताचे India नाव बदलून भारत असे करण्याचा ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.

भारताचे India नाव बदलण्याच्या चर्चांना वेग आला असताना, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी X ट्विटरवर भारतीय ध्वजाच्या इमोजीसह 'भारत माता की जय' अशी पोस्ट केली आहे.

भारताचे India नाव बदलण्याचा मुद्दा नेमका काय?

घटनादुरुस्तीद्वारे भारताचे India नाव बदलून 'भारत' असे करण्याच्या आवाहनाला वेग आला आहे, सूत्रांनी सूचित केले आहे की सरकार बदल लागू करण्यासाठी ठराव आणू शकते.

15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणादरम्यान अशाच भावना व्यक्त केल्या. याशिवाय नागरिकांना गुलामगिरीच्या प्रत्येक खुर्चीतून मुक्त होण्यासह पाच प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले. राष्ट्राच्या स्वदेशी अस्मितेची प्रतीकात्मक गोष्ट म्हणून India चे भारत नाव बदलण्याचा अर्थ लावला गेला.

दरम्यान, मंगळवारी राष्ट्रपती भवनातील G20 प्रतिनिधींसाठी रात्रीच्या जेवणाचे अधिकृत निमंत्रण आले, ज्यामध्ये नेहमीच्या 'India राष्ट्रपती' ऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' असे शीर्षक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT