Grandfather Amitabh Bachchan awed by ‘not so little’ Aaradhya :  esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Reaction : नातीचा स्टेजवरील परफॉर्मन्स पाहिल्यावर आजोबा अमिताभ भारावले, काय होती पहिली प्रतिक्रिया?

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांना बॉलीवूडमधील सेलिब्रेटी उपस्थित होते.

युगंधर ताजणे

Grandfather Amitabh Bachchan awed by ‘not so little’ Aaradhya : धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांना बॉलीवूडमधील सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यात चक्क बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय, किंग खान शाहरुख, अभिषेक बच्चन, सुहाना खान, गौरी खान, आर्यन खान आणि करण जोहर. या मान्यवरांच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या गॅदरिंगमध्ये अभिषेक बच्चन अन् ऐश्वर्या रॉयच्या मुलीच्या परफॉर्मन्सनं अनेकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. त्याचे कौतुकही होत आहे. शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी देखील लाडक्या नातीसाठी पोस्ट शेयर करुन तिचं कौतुक केलं आहे. आराध्यानं एका इंग्रजी एकांकिकेमध्ये काम केलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यावर शेकडो नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

बिग बी अमिताभ यांनी जेव्हा आराध्याचा तो परफॉर्मन्स पाहिला तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, मला खूपच आनंद झाला जेव्हा मी तिचा स्टेजवरील तो परफॉर्मन्स पाहिला. आराध्या त्या भूमिकेत अजिबात लहान वाटत नाही. तिनं पूर्ण फ्लो मध्ये काम केलं. तिनं नैसर्गिक अभिनय केला. बाकीचे देखील तिला यावेळी चिअर अप करत होते. माझ्यादृष्टीनं ही मोठी गर्वाची बाब आहे की, माझ्या नातीनं केलेलं काम प्रेक्षकांना आवडलं.

गर्वाची बाब म्हणावी लागेल जेव्हा ती स्टेजवर दमदारपणे तिची भूमिका करत होती. पुढील काही दिवसांतच मी तुझ्यासोबत असेल. स्टेजवर जे काही होत होते ते पूर्णपणे नॅचरल होते. हे सगळं आमच्यासाठी अभिमानास्पद होते. अमिताभ यांनी सोशल मीडियावर ती पोस्ट शेयर केली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात अमिताभ यांचे नातू अगस्त्य नंदा यांनी डेब्यू केलं होतं. याशिवाय शाहरुखची मुलगी सुहाना खान, खूशी कपूर यांच्या पदार्पणाची चर्चा रंगली होती.

आराध्याचा तो परफॉर्मन्स पाहण्यासाठी अभिषेक आणि ऐश्वर्याही आली होती. ऐश्वर्यानं तर लेकीचा तो परफॉर्मन्स मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. तिनंही तिचं खूप कौतुक केलं आहे, लेकीनं स्टेजवर कमाल केल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. यावेळी प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूर, इशान खट्टर आणि मीरा राजपूत हे देखील सभागृहात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT