Amitabh Bachchan Shah Rukh Khan Aishwarya Rai Dance video  esakal
मनोरंजन

Ambani School Gathering: अंबानींच्या शाळेचं गॅदरिंग अन् चर्चा जगभर.. बच्चन, शाहरुख ऐश्वर्याचा डान्स! करण जोहरही थिरकतोय

बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटी आपल्या लाडक्या नातवांचा, लेकांचा शाळेतील गॅदरिंगच्या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसून आले.

युगंधर ताजणे

Amitabh Bachchan Shah Rukh Khan Aishwarya Rai Dance video : बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटी आपल्या लाडक्या नातवांचा, लेकांचा शाळेतील गॅदरिंगच्या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसून आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे सध्या ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

केवळ अमिताभच नाही तर किंग खान शाहरुख खान, करण जोहर, ऐश्वर्या रॉय, सुहाना खान, अगस्त्य नंदा, आराध्या बच्चन हे या गॅदरिंगमध्ये सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटी किड्सची जोरदार चर्चा आहे. त्याला दुसरे कारण आहे झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यापूर्वी या सगळ्या सेलिब्रेटींनी आपल्या मुलांच्या डेब्यूचे प्रमोशन केले होते.

आता अंबानींच्या शाळेतील गॅदरिंगमध्ये ओम शांती ओम चित्रपटातील गाण्यावर सेलिब्रेटी थिरकताना दिसले. ज्याची चर्चा होत आहे. सध्या बच्चन कुटूंबीय हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. त्याविषयी गॉसिपिंगला उधाणही आले आहे. अशातच व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी स्कूलमधील तो व्हिडिओ खूप काही सांगून जाणारा आहे.

शाहरुखचा लेक अबराम यानं केलेल्या परफॉर्मन्सचे कौतुक होत आहे. ऐश्वर्यानं तिच्या लाडक्या लेकीच्या नाट्य सादरीकरणाचा व्हिडिओ शेयर केला आहे. तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. लेकीनं शाळेतील नाटकात काम करत केलेली ती भूमिका उपस्थित प्रेक्षकांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

२००८ मध्ये आलेल्या ओम शांती ओम या शाहरुखच्या चित्रपटातील गाण्यावर सेलिब्रेटी डान्स करताच्या त्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करुन सेलिब्रेटी किड्सला शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखनंही लेक सुहाना खान आणि करण जोहरसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे.

करिना, गौरीचं चिअर्स अप...

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, गौरी खाननं यावेळी तैमुर आणि अबरामला चिअर्स अप केल्याचं दिसून आलं. त्यांच्या एका परफॉर्मन्सला उपस्थितांकडून टाळ्यांची मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले. शाहरुखलाही लेकाचा तो अंदाज भलताच भावल्याचे त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT