amitabh bachchan shared photo with shah rukh khan, is it hint of don 3 sakal
मनोरंजन

अमिताभ आणि शाहरुख पुन्हा एकत्र.. 'त्या' फोटोमुळे डॉन ३ ची जोरदार चर्चा..

अमिताभ यांनी शाहरुख सोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नीलेश अडसूळ

Amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांची भाषाशैली, त्यांचे शब्दांवरील प्रभुत्व अवघ्या जगाला ठाऊक आहे. ते आपल्या चाहत्यांशीही अशाच मधुर शब्दात संवाद साधत असतात. सोशल मिडियावर ते बऱ्यापैकी चाहत्यांशी जोडलेले आहेत. ते विविध विषय घेऊन सोशल मिडियावर लिहितात किंवा फोटो पोस्ट करतात. नुकताच त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. शिवाय आता 'डॉन ३' चित्रपट येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (Amitabh Bachchan shared a photo with shah rukh khan is it a hint of don)

अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या फोटोत अमिताभ आणि शाहरुख एकत्र दिसत आहेत. फोटोमध्ये अमिताभ डॉन चित्रपटाच्या पोस्टरवर सही करताना दिसत आहेत. या फोटो नंतर अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. चाहत्यांना असं वाटत की बिग शाहरुख आणि अमिताभ एकत्र आले म्हणजे डॉन ३ चित्रपट येणार असून त्यात ही दोन्ही अभिनेते एकत्र असतील.

अमिताभ यांनी शुक्रवारी डॉन चित्रपटा संदर्भातच एक फोटो शेयर केला होता. त्यात लगेचच हा फोटो शेयर केल्याने नेमकं के घडलय याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. शाहरुखसोबतचा हा फोटो म्हणजे लवकरच डॉन ३ येणार असं म्हटलं जातं आहे. विशेष म्हणजे या फोटोला 'डॉन' असे कॅप्शन दिल्याने 'डॉन ३' ची सर्वत्र हवा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT