Amitabh Bachchan Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: "सगळं बोलून झालंय आता फक्त.." ऐश्वर्याला अनफॉलो केल्यानंतर बिग बींच्या ट्विटनं वाढवली चर्चा!

Amitabh Bachchan On Aishwarya Rai Unfollow: बच्चन कुटुंब सध्या चर्चेत आले आहे.

Vaishali Patil

Amitabh Bachchan On Aishwarya Rai Unfollow: बच्चन कुटुंब सध्या चर्चेत आले आहे. बच्चन कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये काहीही चांगले चालले नाही. अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. त्यातच अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याला अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपुर्वी ते 'द आर्चीज' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये एकत्र दिसले. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यात पुन्हा असा दावा करण्यात येत आहे की बच्चन यांच्या घरात वाद सुरु आहेत.

मात्र बच्चन फॅमिलीने यावर मौन पाळले आहे. तर आता अमिताभ बच्चन यांनी या सर्व अफवांच्या चर्चेत x (ट्विट ) वर पोस्ट शेयर केली आहे.

ट्विटर अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर करत त्यांनी या पोस्टच्या कॅप्शममधून अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केल्याचे बोलले जात आहे.

बिग बी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितात, 'T 4854 – सर्व काही सांगितलं, सर्वकाही केलं.. तसं केलं आणि ते केलं..' त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा भाग बनले आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टला प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अनेकांनी या पोस्टचा अर्थ विचारला तर अनेकांनी पसरणाऱ्या अफवांवर प्रतिक्रिया दिल्याचे बोलले आहे. त्याचवेळी अमिताभ आणि बच्चन कुटुंबाने ऐश्वर्या रायला अनफॉलो करण्याच्या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अमिताभ बच्चन यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचं झाले तर ते सोशल मिडियावर खुप सक्रिय असतात. ते Insta वर एकूण 74 लोकांना फॉलो करतात.

या यादित कलाकरांचे नाव सांगायचे झाले तर सलमान खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, विराट कोहली, श्वेता बच्चन नंदा आणि नव्या नवेली नंदा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. तर ऐश्वर्या फक्त पती अभिषेक बच्चनला इंस्टाग्रामवर फॉलो करते.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ते सध्या केबीसीचा शो होस्ट करत आहे. ते शेवटचे 'उंचाई' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. आता ते नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडिट' यांच्या चित्रपटात दिसणार आहे. यात प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT