Amitabh Bachchan & Prabhas
Amitabh Bachchan & Prabhas Google
मनोरंजन

बॉलीवूडच्या शहनशाहला बाहुबलीची पडली भुरळ; पोस्टमध्ये चक्क म्हणालेयत...

प्रणाली मोरे

बॉलीवूडचे बीग बी किंवा सुपरस्टार अशी ज्यांची ओळख आहे अशा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी 'बाहुबली'(Bahubali) प्रभास(Prabhas) जो तसा त्यांच्यासमोर अगदी नवखेला पोरगाच,त्याची भरुभरुन प्रशंसा करीत ट्वीटरवर एक ट्वीट केलं आहे. त्यांची ट्वीटरवरील ती पोस्ट वाचून त्यांच्याविषयीचा मनात असलेला आदर जरा आणखी वाढलाय. काय लिहिलंय असं त्यांनी त्या पोस्टमध्ये की ती वाचून सारेच म्हणत आहेत,'बच्चनजी तूसी ग्रेट हो!'

Amitabh Bachchan Tweet for Prabhas-Image

तर हे ट्वीट कनेक्शन जोडलं गेलं आहे एका नवीन सिनेमाच्या प्रोजेक्टशी. अमिताभ नाग अश्विनच्या नवीन सिनेमात काम करीत आहेत. ज्याचं नाव सध्या तरी आहे 'प्रोजेक्ट के'(Project K). या सिनेमात त्यांच्यासोबत 'बाहुबली' फेम प्रभास देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अमिताभ यांनी या नवीन सिनेमाचे पहिल्या दिवसाचे शूटिंग पार पडल्यानंतर प्रभाससोबत काम करण्याचा आनंद आणि त्याच्या अभिनयाचं कौतूक करणारं एक ट्वीट केलं आहे. बॉलीवूडच्या या शहनशाहने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे,''पहिला दिवस,पहिला शॉर्ट,पहिला सिनेमा बाहुबली प्रभाससोबत. प्रतिभावंत,हुशार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनम्र अशा कलावंतासोबत काम करायला मिळणं हा माझा मी सन्मान समजतो. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे''.प्रभासनेदेखील अमिताभ यांच्यासाठी एक पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यानं त्याच्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्याविषयी भरभरुन कौतूक करणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. अर्थात त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचीच गोष्ट. त्यानं नवीन सिनेमा 'Project K'याविषयी देखील उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

या सिनेमात दीपिका पदूकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिनं या सिनेमाचं काही शूट प्रभाससोबत हैदराबादमध्ये पूर्ण केलं आहे. साय-फाय जॉनरचा हा सिनेमा हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी मध्ये शूट करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांचा नीना गुप्तासोबत देखील एक सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. तसंच बहुचर्चित 'ब्रम्हास्त्र' या त्यांच्या सिनेमाची वाट तर चाहते कधीपासून पाहतायत. या सिनेमात त्यांच्यासोबत रणबीर कपूर,आलिया भट्ट हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसंच त्यांचा '३४','झुंड','द इन्टर्न' हे सिनेमे देखील आपल्या भेटीस येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT