मनोरंजन

'बिग बी तुम्ही झोपा,आम्हालाही झोपू द्या',का म्हणाले युझर्स असं?

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन bollywood big b amitabh bachchan हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन bollywood big b amitabh bachchan हे सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहे. बॉलीवूडमध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या बिग बी हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र ते रात्री अपरात्री पोस्ट करुनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे त्यांना आता ट्रोल व्हावे लागले आहे. यापूर्वी देखील बिग बींना त्यांच्या काही पोस्टमुळे ट्रोल व्हावे लागले आहे. त्याचे कारण ते हल्ली कोणत्याही विषयावर पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ऑलिम्पिकच्या पोस्ट करतानाही त्यांनी केलेल्या पोस्टला चाहत्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र त्यातील काही चुकांमुळे त्यांना टीकाही सहन करावी लागली होती. त्याचं झालं असं की, बिग बी यांनी आता एक पोस्ट शेयर करताना त्यात सोशल मीडियाचं विश्लेषण केलं होतं. त्यामुळे ट्रोलर्सनं त्यांच्यावर टीका केली आहे.

केवळ बॉलीवूडविषयक फोटो आणि व्हिडिओ बिग बी हे काही शेयर करत नाही. त्याशिवाय ते वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आता व्टिटरवर एक फोटो शेयर केला आहे. तो फोटो सोशल मीडियाच्या काही बाबींवर गंभीरपणे भाष्य करणारा आहे. त्यावरुन अमिताभ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रात्री त्यांनी यावर आपली पोस्ट शेयर केली आहे. एवढया रात्री आम्हाला उपदेशाचे डोस का देताय, अशा प्रकारचं उत्तर त्या पोस्टवर यावेळी ट्रोलर्सनं त्यांना दिलं आहे. त्यामुळे बिग बी हे चर्चेत आले आहे. बिग बी यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास ते दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या झुंड नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यापूर्वी येत्या काही दिवसांत त्यांचा चेहरे नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बिग बी यांनी व्टिटरवर लिहिलं होतं की, सोशल मीडियावर रोज किमान ३०० मिलियन फोटो अपलोड होतात. हे खरं आहे. आणि त्याला सिद्ध करण्याची काही गरज नाही. अशा प्रतिक्रियेची एक पोस्ट त्यांनी शेयर केली आहे. त्यामुळे बिग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिग बी यांनी ही पोस्ट रात्री दीड वाजता केली आहे. एवढ्या रात्री ही पोस्ट केल्यानंतर ते चर्चेत आले आहे. रात्री अशा प्रकारच्या पोस्ट करण्यापेक्षा बिग तुम्ही झोपा अशी उत्तरं त्यांना ट्रोलर्सनं दिली आहेत. एवढ्या रात्री यापेक्षा आपल्याकडे आणखी काही वेगळं लिहायला नाही. असंही त्यांनी लिहिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT