Amitabh Bachchan will be the first Indian to be honored with the FIAF Award. 
मनोरंजन

शहेनशहाच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'एफआयएएफ अ‍ॅवॉर्ड' मिळवणारे पहिले भारतीय 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांच्याविषयी जेवढे बोलु तितकं कमी आहे. मोठं योगदान त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिल आहे. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही त्यांच्यातील उत्साह हा काही कमी झालेला नाही. अजूनही ते तरुण कलाकाराप्रमाणे दिवसातील 16 तास काम करत असल्याचे दिसून आले आहे. येत्या वर्षात त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकदा का होईना आपल्याला अमिताभ यांच्याबरोबर काम करायला मिळावे अशी कलाकारांची इच्छा असते. नवोदितांना मार्गदर्शन करण्यात अमिताभ हे नेहमीच पुढाकार घेतात. त्यांना आतापर्यत मिळालेल्या पुरस्कारांची काही गणतीच नाही. मात्र नुकताच त्यांना जो पुरस्कार मिळणार आहे त्याची गोष्ट काही औरच आहे. तो पुरस्कार मिळवणारे अमिताभ हे बॉलीवूडचे पहिले अभिनेते आहेत.

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ यांना नुकताच 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्हज' च्या वतीनं गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवलेले ते बॉलीवूडचे पहिले कलाकार आहेत. केवळ बॉलीवूडच नाही तर भारतीय चित्रपट विश्वातील ते पहिलेच असे कलाकार आहेत त्यांना या पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. चित्रपट विश्वातील त्यांचे योगदान महत्वाचे आहे. ते लक्षात घेऊन त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 19 मार्चला एका ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात येणार असुन तो बिग बी यांना प्रसिध्द दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलान यांनाही यावेळी एफआयएएफ पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.

याबद्ल आणखी माहिती देताना एफआयएएफचे अध्यक्ष फ्रेडरिक मेरे यांनी सांगितले की, यंदा पुरस्काराचे 20 वे वर्ष आहे. त्यामुळे यावर्षीचा समारंभ हा आठवणीत राहावा म्हणून काही खास गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम संस्मरणीय करण्यासाठी जगातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांशिवाय आणखी दुसरा काय पर्याय असणार, असे कलाकार ज्यांनी आपल्या कलेनं गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटांचे जतन आणि संरक्षण केले आहे.

अमिताभ यांचा गौरव करताना आम्हाला असे सुचित करायचे आहे की, चित्रपटविश्व किती विशाल आणि समृध्द आहे. त्यात विविधता आहे. त्यासाठी अमिताभ यांचे योगदान महत्वाचे वाटते. तसेच अमिताभ यांनीही एका ठिकाणी सांगितले होते की, आता भारतातही चित्रपटांच्या संरक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT