मुंबई- अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऍश्वेर्या यांची मुलगी आराध्याचा आज ९वा वाढदिवस आहे. आराध्या बच्चन सगळ्यात लहान आणि सगळ्यात लाडकी सदस्य आहे. आज तिच्या ९व्या वाढदिवशी बच्चन कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे नेहमीप्रमाणे ग्रँड सेलिब्रेशन केलं जाणार नाहीये. मात्र बॉलीवूडमधून आराध्यावर अनेकजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या लाडक्या नातीसाठी वाढदिवशी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर आराध्या बच्चनच्या बर्थडेचा आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या लाडक्या नातीच्या फोटोंचा एक कोलाज सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये आराध्याचे ९ वर्षांचे ९ फोटो असं कोलाज केलं आहे. अमिताभ यांनी फोटो शेअर करत लिहिलंय, वाढदिवसाच्या शुभेच्छा आराध्या. माझं प्रेम तुझ्यासोबत आहे. यासोबत त्यांनी रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
आराध्याच्या सगळ्या फोटोंना बिग बींनी नंबर दिले आहेत. ज्यातून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जेव्हा ती एक वर्षाची होती तेव्हा कशी होती ते ९ वर्षांपर्यंत तिच्यात कसा बदल झाला. बिग बींच्या या पोस्टला आत्तापर्यंत लाखो चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत आणि आराध्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
amitabh bachchan wishes happy birthday to grand daughter aaradhya shares 9 photos of 9 years
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.