Amitabh Bachchan is your TV sets with a new edition of popular reality quiz show Kaun Banega Crorepati.jpeg 
मनोरंजन

किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पडता है वापस आना पडता है : बिग बी पुन्हा कौन बनेगाच्या सेटवर

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रसिध्द शो कौन बनेगा करोडपती हा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यापुर्वी अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक कविता शेयर केली आहे. त्यात त्यांनी '' किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पडता है वापस आना पडता है '' असे म्हणुन सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे.

कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय कार्यक्रम या सोमवार पासुन सुरु झाला.  यंदा या कार्यक्रमाचा बारावा सीझन आहे.  छोट्या पडद्यावर सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय कार्यक्रम म्हणुन कौन बनेगा करोडपती चे नाव घ्यावे लागेल.  केबीसी या शोने अनेकांना ‘करोडपती’ केले. गेली अनेक वर्षांपासून महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत.  सूत्रसंचालक म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला उंचीवर नेले, एक वेगळी ओळख दिली. आपल्या खास शैलीत स्पर्धकांशी संवाद साधत ‘कौन बनेगा करोडपती’ला एक नवं परिमाण दिले.

अमिताभ केबीसीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून एकाच स्टाईलचा सूट कॅरी करत आहेत. होय, गेल्या 3 वर्षांपासून थ्री-पीस सूटमध्येच बिग बी केबीसी होस्ट करत आहेत. एका रिपोर्टनुसार, अमिताभ केबीसीच्या एका भागासाठी 3 ते 5 कोटी रूपये घेतात. या सीझनच्या एका एपिसोडसाठी बिग बी 3 ते 5 कोटी घेत असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.   केबीसी 12च्या सेटवर फास्टेस्ट फिंगर टेस्ट राऊंड खेळणा-या सर्व स्पर्धकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका हॉटेलात क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोबत हा राऊंड खेळणा-यांची संख्या यावेळी कमी करून 8 करण्यात आली आहे.

२०१३ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत बिग बींनी केबीसीविषयी सांगितले होते की, "हा कार्यक्रम अशा काळात मला भेटला जेव्हा मला याची सर्वात जास्त गरज होती. व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या त्याने मला मोठा आधार दिला. माझ्यावर असलेले कर्ज यामुळे फेडता आले. एका बातमीनुसार बिग बींनी पहिल्या पर्वातील 85 भागांतून सुमारे 15 कोटींची कमाई केली होती.  जेव्हा अमिताभ यांना या शोची ऑफर मिळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्यांनी छोट्या पडद्यावर काम करु नये असे वाटले होते. कारण टीव्हीवर जाण्याने त्यांचे स्टार व्हॅल्यू कमी होईल, असे त्यांना वाटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT