Amitabh Bachchan,Virat Kohli Google
मनोरंजन

विराट कोहलीवर बिग बी 'या' कारणामुळे झालेयत नाराज...

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितले यामागचे कारण

प्रणाली मोरे

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे एक असं व्यक्तीमत्त्व आहे जे सोशल मीडियावर जे काही पोस्ट करतात त्याची चर्चाही होतेच. ब-याचदा त्यांच्या पोस्ट या खूप विचार करायला लावणा-या असतात. त्यांनी पोस्ट केलेली एखादी कविता केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसते तर सखोल वैचारिक मंथन करायला लावणारी असते. आता वयाच्या ऐंशीतही बिग बी सोशल मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असतात. आपल्या फॅन्सना ते अनेकदा स्वतः उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. बरं इतकंच नाही तर सोशल मीडियावर ते अनेक सेलिब्रिटींच्या पोस्टवर मजा-मस्तीवाल्या कमेंटही करीत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये त्यांनी क्रिकेटर विराट कोहलीचा(Virat Kohli) उल्लेख केला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये नाराजीचा थेट सुर नसला तरीही बिग बींच्या मनात विराटमुळे काहीतरी सलतंय हे मात्र उगाचच वाटून राहतंय.

तर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर करीत म्हटलंय,''मी पाहिलं तर विराटच्या फॅन्सचा नंबर हा माझ्यापेक्षा कैकपटींन जास्त आहे. त्याच्या एखाद्या फोटोला जेवढे व्ह्यूज मिळतात तेवढे मी शेअर केलेल्या फोटोला मिळत नाहीत. हे मुद्दामहून इथे शेअर करीत आहे. मला हे इथं सांगावसं वाटलं. यात लपवण्यासारखं काहीच नाही. सर्वांना हे कळायला हवं कारण हेच सत्य आहे. तो फॅन्सच्या नंबर रेस मध्ये माझ्यापेक्षा पुढे आहे. त्याचे जवळजवळ १७२ मिलियन फॅन्स आहेत तर माझे अगदीच जमवाजमव करून २९ मिलियनच्या आसपासही नसतील फारसे''. ही पोस्ट अमिताभ यांनी ब्लॅक टक्सिडो ड्रेसमधील फोटो शेअर करताना टाकली आहे.

यावरनं एक गोष्ट मात्र लक्षात येते की बॉलीवूडच्या या महानायकानं आकाशात उंच भरारी घेऊन आपलं अढळ स्थान निर्माण केलं असलं तरी आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. दुस-याला मोठेपणा दिल्याने आपण खुजं बनत नाही हे त्यांना उत्तम कळतं म्हणूनच आज ते उच्च पदावर आहेत. असो, तर अमिताभ नेहमीच सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या पोस्टवर कमेंट करीत असतात. त्यामधंन मजा-मस्करीवाले विनोदही ते हमखास करतात. विराट-अनुष्काही त्यांच्या कमेंटचा नेहमी आनंद घेऊन त्यावर प्रतिक्रिया देत असतात. विराट कोहलीही अनेकदा अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतो. अमिताभ बच्चन यांना मानाच्या 'दादासाहेब फाळके पुरस्कारानं' सन्मानित करण्यात आलं होतं तेव्हा विराटनंही अमिताभ बच्चन यांचं अभिनंदन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT